बॉलीवूड सरसावले; अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना थेट लंडनहुन आणणार ऑक्सिजन

मुंबई । देशात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर चालले आहे. यामुळे आता अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री ट्विंकल खन्नाही पुढे आली आली आहे. ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे.

यामध्ये तिने विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली आहे. जे रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात. मी त्यांना थेट लंडनवरुन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करेन. असे ट्विट ट्विंकलने केले आहे.

सध्या बॉलीवूडमधील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. सलमान खान, अक्षय कुमार, सोनू सूद यांनी मोठी मदत केली आहे. यामुळे आता ट्विंकल खन्नाने देखील मोठी मदत करणार आहे. यामुळे अनेकांना फायदा होणार आहे.

ट्विंकलच्या या संवेदनशील स्वभावाचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे. गेल्यावर्षी अक्षय कुमारने पीएम केअर फंडला २५ कोटींची मदत केली होती. तो देखील सतत मदत करत असतो.

आता ट्विंकल खन्नाने एक पाऊल पुढे टाकत मोठी मदत केली आहे. यामुळे आता लंडनहून ऑक्सिजन सिलेंडर येणार आहेत. राज्यासह सध्या देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

सध्या बॉलीवूड कलाकार, खेळाडू, समाजसेवक आपल्या परीने मदत करत आहेत. लॉकडाऊन असल्याने अनेकांना दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेकजण पुढे येत आहेत.

ताज्या बातम्या

हेमामालिनीसोबत किसिंग सीन करणार होते फिरोज खान; पण ‘या’ व्यक्तीने केला कडाडून विरोध

ठाण्यातील रुग्णालयात भीषण आग, चार रुग्णांचा मृत्यु; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.