आर्यनला कोर्टाच्या दिलाश्यानंतर बाॅलीवूड आक्रमक; निर्माता म्हणतो आता भरपाई कोण देणार

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव गेल्या महिन्यात चर्चेत होते. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने 2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई ते गोव्याच्या क्रूझवर रेव्ह पार्टी दरम्यान अटक केली होती.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर कडक कारवाई करत एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी खटला सुरू केला. त्यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. आर्यन खानला जवळपास 25 दिवस तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यानंतरच तो मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर बाहेर येऊ शकला.

आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला निर्दोष सांगताना मुंबई उच्च न्यायालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा सिद्धांत चुकीचा ठरवला आहे.

आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. जारी केलेल्या जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘केवळ आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा एकाच क्रूझवरून प्रवास करत होते, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपांचा आधार होऊ शकत नाही.’

यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, ‘म्हणजेच आर्यन खान, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे निर्दोष होता आणि तो निर्दोष आहे. आता त्याला जो काय त्रास झाला, त्याच्या कुटुंबीयांचे जे हाल झाले, त्याची भरपाई कोण देणार.

हे ही वाचा-
पुढील एक महिना संप चालूच राहणार? आता पुढील सुनावणी २० डिसेंबरला; वाचा कोर्टात काय घडले..   
प्रत्येक महिन्याला ६०० लोकांना अयोध्येच्या यात्रेला घेऊन जाणार, काँग्रेस आमदाराची अनोखी घोषणा
पराभवाच्या भितीने भाजपने पळ काढला, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.