खुप वाईट होता बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवट; गळा दाबून करण्यात आली होती हत्या

६० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंश आज या जगात नसल्या तरी त्यांच्या आठवणी मात्र नेहमीच आपल्यासोबत राहतील. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशमध्ये झाला होता. त्याचे खरे नाव विरा सुंदर सिंग होते.

असे बोलले जाते की प्रिया राजवंशने त्यांच्या करिअरची सुरुवात खुप धमाकेदार पद्धतीने केली होती. पण त्यांचा शेवट तेवढाच वाईट झाला होता. प्रियाला देवनादंचे छोटे भाऊ चेतन आनंदने हकीकत चित्रपटातून बॉलीवूडमध्ये लॉन्च केले होते.

१९६४ मध्ये रिलीज झालेल्या हकीकत चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यासोबतच प्रियाला देखील इंडस्ट्रीमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटाच्या शुटींग वेळी प्रिया आणि चेतनमध्ये जवळीक वाढत होती.

ज्यावेळी चेतन प्रियाला भेटले होते त्यावेळी विवाहीत होते. त्यांना विवेक आणि केतन आनंद अशी दोन मुलं होते. पण त्यांच्या पत्नीसोबत चांगले संबंध नव्हते. त्यामूळे दोघे वेगळे राहत होते. त्यांची मुलं देखील आईसोबत राहत होते.

दुसरीकडे चेतन आणि प्रियाच्या अफेअरच्या चर्चा वाढत होत्या. ७० च्या दशकामध्ये दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तब्बल २५ ते २७ वर्ष दोघे एकत्र राहत होत. पण तरीही त्यांनी लग्न केले नाही. त्यांचे एकमेकांवर खुप जास्त प्रेम होते.

चेतनचे प्रियावर खुप जास्त प्रेम होते. खास प्रियासाठी त्यांनी मुंबईमध्ये घर खरेदी केले होते. दोघांचे आयूष्य चांगले सुरु होते. आडचण त्यावेळेस आली जेव्हा चेतनने त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्से केले. दोन्ही मुलांसोबत त्यांनी प्रियाला देखील प्रॉपर्टी दिली होती.

हिच गोष्ट चेतन आनंदच्या मुलांना आवडली नाही. या वादावरुन त्यांनी प्रियाची हत्या केली. २६ मार्च २००० रोजी चेतन आनंदच्या मुलांनी प्रियाची हत्या केली होती. या घटनेने फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. सर्वांसाठी हा खुप मोठा धक्का होता.

घरातील नोकरांच्या मदतीने केतन आणि विवेकने प्रियाची हत्या केली होती गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली होती. २००२ साली दोन्हील मुलांना आणि घरातील नोकरांना अटक करण्यात आली होती. आजही कोर्टामध्ये ही केस सुरु आहे.

प्रिया राजवंशने बॉलीवूडमध्ये अनेक वर्ष काम केले होते. त्यांना खुप जास्त प्रसिद्धी देखील मिळाली होती. पण प्रेमात पागल झालेल्या प्रियाला त्यांचा जीव गमवून सर्व गोष्टींचा मोबदला द्यावा लागला होता. प्रिया राजवंशची हत्या ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा घटना होती.

महत्वाच्या बातम्या –

शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

सिद्धार्थच्या प्रेमात पागल झाली होती विद्या बालन; काहीही विचार न करता बनली तिसरी बायको

काकांनी शम्मी कपूरला दिला होता ‘हा’ मोठा धोका; शेवटपर्यंत विसरले नव्हते शम्मी कपूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.