वाचा इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री झीनत अमानच्या तीन लग्नांची कहाणी

बॉलीवूडला खऱ्या अर्थाने बोल्ड बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सर्वात पहीले नाव येते ते म्हणजे झीनत अमान. ७० च्या दशकातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये त्यांचे नाव येते. झीनतने बॉलीवूड अभिनेत्रींना बोल्ड आणि बिंधास्तपणा शिकवला आहे.

७० च्या दशकात झीनत अमानने एका ब्यूटी स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेच्या विजेत्या बनल्यानंतर त्यांनी खऱ्या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. देवानंदने त्यांना हरे कृष्णा हरे रामा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये लॉन्च केले होते. त्यानंतर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहीले नाही.

झीनत इंडस्ट्रीतील सर्वात मॉडर्न अभिनेत्री होत्या. म्हणून त्या फिल्मी पडद्यावर खुप जास्त एक्सोज करायला घाबरत नव्हत्या. त्यांनी बिंधास्तपणे चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले. त्यांच्या या वेगळ्या अंदाजामूळेच त्यांना इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये गणले जाते.

२०२१ मध्ये झीनत अमान यांनी बॉलीवूडमध्ये ५० वर्ष पुर्ण केली आहेत. इंडस्ट्रीमध्ये ५० वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद खुप मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. त्यांनी एका पार्टीचे आयोजन करुन या गोष्टीचे सेलिब्रेशन केले.

सुरुवातीला झीनत अमानला अभिनयात रुची नव्हती. त्यांना पत्रकार बनायचे होते. पण देवानंदमूळे त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. एकदा अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहीले नाही. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यांनी केले.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनसोबत त्यांनी सर्वाधिक चित्रपट केले होते. दोघांच्या जोडीला प्रेक्षकही खुप जास्त पसंत करत होते. दोघांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्यांची मैत्री देखील खुप खास होती. इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले.

झीनत अमानचे फिल्मी करिअर खुप चांगले होते. पण वैयक्तिक आयूष्यात मात्र त्यांना खास यश मिळाले नाही. एक दोन नाही तर त्यांनी तीन लग्न केले होते. त्यांचे तीनही लग्न यशस्वी होऊ शकले नाहीत. आज झीनत एकट्या राहतात.

झीनत अमानने पहीले लग्न अभिनेता संजय खानसोबत केले होते. अब्दूला चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केले. संजय खान अगोदरपासूनच विवाहीत होते. त्यामूळे त्यांनी झीनतचा पत्नी म्हणून स्वीकार करायला नकार दिला.

याच गोष्टीमूळे दोघांचे भांडण लोकांसमोर आले. असे बोलले जाते की, संजय खान आणि त्यांच्या पहील्या पत्नीने झीनत अमानला मारहाण केली होती. त्यामूळे त्या अनेक दिवस हॉस्पिटमध्ये होत्या. तरीही त्यांनी संजय खानवर गुन्हा दाखल केला नव्हता.

त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न १९८५ मध्ये मझहरसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न जास्त यशस्वी होऊ शकले नाही. दोघांना दोन मुलं झाली. झीनतचे त्यांच्या पतीसोबत संबंध काही खास नव्हते. रोज दोघांच्या भांडणाच्या बातम्या समोर येत होत्या.

त्यामूळे काही दिवसांमध्येच झीनत अमानचे दुसरे लग्न तुटले. झीनत अमानने तीसरे लग्न सरफरोश नावाच्या व्यक्तिसोबत केले होते. पण त्यांनी कधीही या गोष्टीचा स्वीकार केला नाही. झीनतने आपल्यापेक्षा ३५ वर्ष छोट्या व्यक्तिसोबत लग्न केले होते. त्यामूळे त्यांनी कधीच या लग्नाचा स्वीकार केला नाही.

आजही झीनत अमान आणि सरफोरशची केस कोर्टात सुरु आहे. इंडस्ट्रीमध्ये राज्य करणाऱ्या झीनत खऱ्या आयूष्यात मात्र यशस्वी होऊ शकल्या नाहीत. त्यांची तिन्ही लग्न अयशस्वी झाली. आज झीनत चित्रपटांपासून दुर एकट्याच आयूष्य जगत आहेत.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था
राजकूमार संतोषीपासून विक्रम भट्टपर्यंत ‘हे’ दिग्दर्शक त्यांच्याच अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते पागल
अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत
‘शोले’ चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने केला होता डिझाइन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.