‘हे’ मुस्लिम कलाकार हिंदू नाव लाऊन बाॅलीवूडमध्ये झाले प्रसिद्ध; नावे वाचून बसेल धक्का

टिम काथ्याकूट – फिल्म इंडस्ट्री सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र आहे. भारतामध्ये अनेक लोकांना बॉलीवूडचे आकर्षण आहे. बॉलीवूडमध्ये येण्यासाठी रोज लाखो लोक प्रयत्न करत असतात.

हे सर्वजण बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी कोणतेही काम करायला तयार असतात. त्यातल्या त्यात बॉलीवूड जगातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक आहे.

त्यामूळे लाखो लोक त्यांचे नशीब आजमावण्यासाठी बॉलीवूडमध्ये येत असतात. पण प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

कधी कधी तर कलाकारांना त्यांचे खरे नाव बदलून दुसरे नाव ठेवावे लागते. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक गोष्टी नावावर अवलंबून असतात.

त्यामूळे अनेक कलाकार त्यांचे नाव बदलतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत जे मुस्लिम असूनही हिंदू नावाने प्रसिद्ध झाले आहेत.

चला तर मग जाणून घेऊया बॉलीवूडच्या अशा कलाकारांबद्दल ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर आपल्या नावात बदल केले आहेत.

१) अर्जुन – बी आर चोप्रा यांच्या प्रसिद्ध महाभारत मालिकेतील अर्जुन या पात्राला सर्वजण ओळखतात. पण तुम्हाला धक्का बसेल की अर्जुन हे पात्र निभावणाऱ्या अभिनेत्याचे खरे नाव फिरोज खान आहे.

महाभारत या मालिकेत काम केल्यानंतर त्यांना अर्जुन याच नावाने ओळखले जाऊ लागले. ते आजही याच नावाने प्रसिद्ध आहेत. जिगर, मेहंदी, करण अर्जुन अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

२) रीना रॉय – ८० आणि ९० च्या दशकात रिना रॉय यांनी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते.

पण खुप कमी लोकांना माहीत आहे की, रिना रॉय यांचे खरे नाव सायरा अली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांच्या नावात बदल केला होता. त्या नावाचा त्यांना फायदाही तेवढाच झाला.

३)दिलीप कुमार – दिलीप कुमार बॉलीवूडचे सर्वात प्रभावी अभिनेते आहेत. त्यांना आजही त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.

पण दिलीप कुमार हे त्यांचे खरे नाव नाही. त्यांचे खरे नाव मोहम्मद यूसुफ खान असे आहे. दिलीप कुमार यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम होते.

४)जगदिप – जगदीप बॉलीवूडचे एव्हरग्रीन कॉमेडियन आहेत. त्यांनी त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांना खुप हसवले आहे. आजही त्यांचे चित्रपट अनेकांची मने जिकून घेतात.

पण खुप कमी लोकांना त्यांचे खरे नाव माहीत आहे. त्यांचे खरे नाव इस्तियाक अहमद जाफरी होते. पण बॉलीवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या नावात बदल केला.

महत्वाच्या बातम्या
राजकूमारला प्रचंड घाबरायचे रजनीकांत; एकदा तर हात जोडून केली ‘ही’ विनंती; वाचा पुर्ण किस्सा
बापाने पेपर टाकून इंजिनीअर केलं, नोकरी मिळाली, साखरपुडाही झाला पण कोरोनाने सगळं हिरावलं
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?
किस्से आबांचे: जेव्हा आबा ड्रायव्हरला म्हणतात गाडी तुझ्या घरी घे; आई बाबांना भेटू..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.