बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन; ८८ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. त्या ८८ वर्षांच्या होत्या. शशिकला यांची प्राणज्योत आज दुपारी १२ वाजता मावळली आहे.

७० च्या दशकात त्या एक प्रसिद्ध हिरोईन होत्या. त्यांच्या सौंदयामुळे आणि त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. शशिकला यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ मध्ये झाला होता.

शशिकला यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला होता, त्यांचा पहिला चित्रपट हा ‘जिनत’ होता. या चित्रपटाला नूर जहाँच्या पतीने म्हणजेच शौकत रिजवीने बनवला होता. या चित्रपटासाठी शशिकला यांना २५ रुपये मिळाले होते.

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख मिळाल्यानंतर शशिकला यांनी ओम प्रकाश सहगल यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या होत्या. पण पुढे जाऊन दोघांमध्ये भांडन झाले आणि दोघे पती पत्नी वेगळे झाले.

शशिकला यांनी तीन बत्ती चार रास्ता, हमजोली, सरगम, चोरी चोरी, नीलकमल, अनुपमा या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी चित्रपटासोबतच टीव्हीवरील मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. त्यांनी प्रसिद्ध मालिका सोनपरीमध्ये फ्रूटीच्या दादीची भूमिका निभावली होती. २००७ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.