बॉलीवूड (Bollywood): कोरोना महामारीने प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम केला आहे. ग्लॅमरच्या दुनियेतील लोकही साथीच्या संकटापासून सुटलेले नाहीत. कटकच्या झंजिरमंगला येथील तरुणी सुचिस्मिता राउत्रे हिने कोरोनाच्या आधी बॉलीवूडमध्ये सहाय्यक कॅमेरा पर्सन म्हणून पाच वर्षे काम केले होते.
ती आजकाल शहरातील रस्त्यांवर मोमोज विकताना दिसत आहे. सुचिस्मिताने वरुण धवन, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि इमरान हाश्मी यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसह काम केले आहे. भविष्यात सिनेमॅटोग्राफर होण्याचे तिचे स्वप्न होते.
कोरोनाकाळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे तिची स्वप्नं भंग पावली. काही महिन्यांतच तिची बचत संपल्याने तिने उदरनिर्वाहासाठी मुंबईत सुमारे ८ महिने संघर्ष केला. त्यानंतर अखेरीस तिला या वर्षी जानेवारीमध्ये तिच्या गावी परतावे लागले. खरं तर, कोरोनामुळे तिच्याकडे खाण्यासाठी आणि घरी जाण्यासाठीही पैसे नव्हते.
अशा परिस्थितीत सलमान खान आणि अमिताभ बच्चन मदतीसाठी पुढे आले आणि त्यांच्या मदतीमुळे ती ओडिशामध्ये तिच्या घरी पोहोचली. सुचस्मिता राउत्रे हिने सांगितले होते, की लॉकडाऊनपूर्वी तिचे आयुष्य व्यवस्थित सुरु होते. तिला अपेक्षित काम आणि नवीन संधीही मिळत होत्या, पण कोरोनाच्या आगमनानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं.
आज ती दररोज मोमोज विकून केवळ ३०० ते ४०० रुपये कमवू शकते. मात्र, सुचिस्मिताने आता तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनलदेखील उघडले आहे आणि तिच्या रेसिपी लोकांसोबत शेअर करत आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रातील जनतेकडून टिकेची झोड उठताच कोश्यारींचा घेतला सपशेल यु टर्न; म्हणाले…
मराठा समाजाला धक्का! नवीन देणे तर दूरच पण हायकोर्टाने आधी होते ते आरक्षणही घेतले काढून
Aditya thackeray: भाषण करताना अचानक सुरू झाली अजान, आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटतं दोन मिनिटं…