८० आणि ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये पुनम ढिल्लोंच्या नावाचा समावेश होतो. खुप कमी वयातच त्यांनी मिस इंडीयाचा ताज जिंकला होता. त्यानंतर काही कालावधीमध्येच त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.
पुनमचा जन्म कानपूरमध्ये झाला होता. पण त्यांचे बालपण चंढीगडमध्ये गेले. शालेय शिक्षण पुर्ण न करताच त्यांनी कॉलेज सोडले. त्यानंतर त्यांनी आपल्या मैत्रीणींसोबत मिस इंडीयाचा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी मिस इंडीयाची स्पर्धा जिंकली.
हि स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांना दिल्लीला बोलवण्यात आले. तिथे त्यांचा फोटोशूट करण्यात आला. हे फोटो बघून दिग्दर्शक यश चोप्राने त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. ‘त्रिशूल’ चित्रपटातून पुनमने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहील्याच चित्रपटामध्ये त्यांनी अमिताभ बच्च, संजीव कुमार, शशी कपूर, हेमा मालिनी यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले.
पुनमचा पहीलाच चित्रपट फ्लॉप झाला होता. म्हणून त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीमध्ये यश च्रोप्राने त्यांना ‘नुरी’ चित्रपटाची ऑफर दिली. हा चित्रपट फ्लॉप झाला तर त्या फिल्म इंडस्ट्री सोडणार होत्या. पण हा चित्रपट सुपरहिट झाला.
नुरी चित्रपटाने त्यांना बॉलीवूडमध्ये स्टार बनवले. या चित्रपटानंतर इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे पुनमचे चर्चे होते. अनेक मोठे दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्यासोबत काम करायला तयार होते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करुन इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली.
पुनमने त्या काळातील सगळ्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. जसे की, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, राज बब्बर, विनोद खन्ना, शत्रूघ्न सिन्हा, मिथून चक्रवर्ती अशा मोठ्या मोठ्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पुनमने निराशा, रेड रोज, ये वादा राहा, तेरी कसम, सोनी महवाल असे अनेक सुपरिहट चित्रपट केले. या चित्रपटातून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली होती. त्या बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाऊ लागल्या होत्या.
करिअरच्या टॉपवर असताना पुनमने अशोक ठक्केरियासोबत लग्न केले. एका पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८८ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्न केल्यानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून लांब गेल्या.
पण लग्नाच्या काही काळानंतर या दोघांमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली. म्हणून दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. १९९७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांना अशोक आणि पलोमा ही मुलं आहेत. घटस्फोट झाल्यानंतर पुनमने परत एकदा अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
त्यांचे कमबॅक एवढे चांगले नव्हते. पण तरीही त्याना यश मिळाले. त्यांना अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भुमिका केल्या. जुदाई, मिला ना मिलो, दिल बोले हड्डिपा, रमैया वस्तावया अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्या स्वत: चा व्यवसाय देखील करतात.
मोठ्या पडद्यासोबतच त्यांनी छोट्या पडद्यावर देखील काम केले आहे. २००९ मध्ये त्यांनी ‘बिग बॉस’मध्ये देखील सहभाग घेतला होता. त्या आजही खुपच सुंदर दिसतात. त्यांनी आपल्या फिटनेसची खुप काळजी घेतली आहे. आजही त्यांचे लाखो चाहते आहते.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिनयासोबतच ‘हा’ व्यवसाय करते बिपाशा बासू; वर्षाला कमावते करोडो रुपये
काय सांगता! कोरोना झाल्यानंतर अभिषेक बच्चनला अजय देवगणने फोन करुन झापलं होतं
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा खऱ्या आयूष्यात कशी आहे बघा; वाचा तिची जीवनकहाणी
जाणून घ्या मन उधाणं वाऱ्याचे आणि तुजविण सख्या रे मालिकेतील अभिनेत्री आज काय करत आहेत
‘सोनपरी’ फेम मृणाल कुलकर्णी आज जगत आहेत ‘असे’ आयुष्य; वाचून धक्का बसेल