बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात घातले होते सर्वात महाग दागिने; किंमत वाचून थक्क व्हाल

बॉलीवूडमध्ये कलाकारांच्या अनेक गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असते. यात त्यांचे राहणे, त्यांचे घर, अफेअर्स अशा गोष्टींचा समावेश असतो. खास करुन त्यांच्या लग्नाची खूप जास्त चर्चा होते. त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यात लोकांना खुप रुची असते.

त्यांच्या प्रत्येक एक गोष्टी खुप महागड्या असतात.
बॉलीवूड कलाकारांचे दुध देखील सर्वात महाग असते. पण गोष्ट जर लग्नाशी संबंधित असेल तर मग ती गोष्ट खुपच महत्वाची असते.

बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या लग्नामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी ठेवत नाहीत. त्यांची प्रत्येक एक गोष्ट सर्वात चांगली असते. अभिनेत्री तर त्यांच्या लुकपासून सगळ्या गोष्टींवर खुप खर्च करतात. त्यांचे दागिने करोडो रुपयांचे असतात.

त्याचप्रमाणे बॉलीवूड अभिनेत्रींचे मंगलसूत्र देखील तेवढेच महाग आहेत. जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींबद्दल ज्यांची मंगूळसुत्र आहेत सर्वात महाग

शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमूळे नेहमीच चर्चेत असते. पण तिच्या लग्नाच्या वेळेस ती तिच्या मंगळसूत्रामूळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. २००९ मध्ये शिल्पाने राज कुद्रांशी लग्न केले होते. दोघांच्या लग्नात करोडो रुपये खर्च झाले होते.

लग्नातील शिल्पाचे मंगळसूत्र खुप महाग होते. त्याची किंमत सुमारे तीस लाख रुपयांचे आहे शिल्पा अनेकदा मंगळसूत्र हातात ब्रेसलेटसारखे परिधान करताना दिसली आहे. त्याची किंमत सुमारे ४० लाख आहे.

सोनम कपूर – सोनम बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे. सोनमने आनंद आहूजासोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नातील मंगळसूत्र एका मोठ्या ब्रॅंडचे आहे. ते मंगलसूत्र ती कोणत्याही ड्रेसवर घालू शकते. त्याची किंमत ४५ लाख आहे.

एश्वर्या राय – बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने सर्वांना वेडे केले आहे. एश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. बॉलीवूडमध्ये या लग्नाची चर्चा तर होतीच.

पण त्याच बरोबर एश्वर्याच्या मंगळसूत्राची देखील तेवढीच चर्चा होती. कारण तिच्या मंगळसूत्रामध्ये हिरे जडलेले होते. त्याची किंमत ४५ सुमारे लाख आहे. मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्याने तिच्या मंगळसुत्राची डिझाइन बदलून घेतली होती.

दिपीका पादूकोण – बॉलीवूडची डिंपल ब्यूटी दिपीकाने रणवीर सिंगसोबत २०१८ मध्ये लग्न केले. या लग्नामध्ये ती घालतेल्या मंगळसूत्राची किंमत २० लाख होती. हे मंगळसूत्र खुप खास आहे. कारण त्याची डिझाइन स्वतः दिपीकाने केली होती.

महत्वाच्या बातम्या –

करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत अमिताभ बच्चन; पण त्यांचा भाऊ आजही जगतो हलाखीचे जीवन

अनुष्का शेट्टी नाही तर ‘या’ अभिनेत्रीसोबत प्रभास करणार आहे लग्न; पहा फोटो

अरे देवा! सारा मोठ्या भावाला तर जान्हवी छोट्या भावाला करत होती डेट; ‘या’ व्यक्तिमूळे झाले ब्रेकअप

अमृता सिंग गेल्या पंधरा वर्षांपासून आहे सिंगल; जाणून घ्या कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.