एका स्वप्नामूळे झाली होती अभिनेत्रीची हत्या; तीन दिवस मृतदेह घरात सडत होता

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे स्वप्न लाखो लोकं बघत असतात. हेच स्वप्न पुर्ण करण्यासाठी अनेक तरुण तरुणी रोज मुंबईला येतात. पण प्रत्येकाचे हे स्वप्न पुर्ण होत नाही. अनेकांना परत घरी जावे लागते. तर कधी कधी हे स्वप्न तरुण तरुणीच्या जीवावर येते.

अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही कहाणी आहे २७ वर्षांच्या कृतीका चौधरीची. मुंबईला अभिनेत्री बनण्यासाठी आलेली कृतिका रातोरात गायब झाली. तिच्या अभिनेत्री बनण्याचे स्वप्नाने तिचा जीव घेतला होता. जाणून घेऊया कृतिका चौधरीची पुर्ण कहाणी.

कृतिका उत्तराखंडची होती. एका लहान गावात जन्मलेल्या कृतिकाला अभिनेत्री बनायचे होते. पण तिचे कुटूंब मात्र तिच्या या स्वप्नाच्या विरोधात होते. तिच्या कुटूंबियांना ही गोष्ट मान्य नव्हती. काहीही झाले तरी कृतिका तिचे स्वप्न सोडायला तयार नव्हती. तिला अभिनेत्री व्हायचे होते.

अभिनय शिकण्यासाठी ती दिल्लीला आली. कारण तिला माहीती होते बॉलीवूडमध्ये काम करायचे असेल तर मग अभिनय तर यायलाच हवा. त्यासाठी तिने दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच दिवसांमध्ये तिची भेट एका विवेक नावाच्या व्यक्तिसोबत झाली. हळूहळू दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

काही दिवसांमध्येच कृतिकाने विवेकसोबत लग्न केले आणि दोघे मुंबईला शिफ्ट झाले. तिने एकता कपूरच्या ‘परिचय’ मालिकेत काम केले. मोठ्या भुमिका तर कृतिकाला मिळाल्या नाहीत. पण अनेक छोट्या मोठ्या भुमिका टेलिव्हिजन आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये केल्या.

त्यासोबतच कृतिका घर चालवण्यासाठी मॉडेलिंग आणि साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम करु लागली. कृतिकाचा तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता. त्यामूळे ती मुंबईत एकटी राहत होती. कृतिकाने कंगना राणावतच्या ‘रज्जो’ चित्रपटात तिच्या बहीणीची भुमिका निभावली होती.

२०१७ मध्ये मुंबई पोलीसांना एका सोसायटीतून फोन येतो. सोसायटीमध्ये खुप घाण वास येत असल्याची तक्रार त्या लोकांनी केली होती. पोलीसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना एका फ्लॅटमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळाला. त्या मुलीला मरुण दोन ते तीन दिवस झाले होते.

तो मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून कृतिका चौधरीचा होता. या बातमीने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण कृतिका इंडस्ट्रीत चांगले काम करत होती. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून लोकं शॉक झाले होते. कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कृतिकाचा खुन झाला होता. अनेक दिवसांच्या चौकशीनंतर खुनाचे खरे कारण समोर आले होते. कृतिका बॉलीवूडमध्ये यशस्वी होऊ शकली नाही. त्यामूळे तिला नशेची सवय झाली होती. ती दारु आणि ड्रग्जसारख्या गोष्टी घेत होती.

ड्रग्जचे ६००० न दिल्यामूळे दोन तरुणांनी कृतिकाची हत्या केली होती. हत्येनंतर तिचा मृतदेह तीन दिवस सडत होता. फ्लॅटमधून वास यायसा सुरुवात झाली त्यावेळी लोकांनी या गोष्टीची तक्रार पोलीसांकडे केली होती. अभिनेत्री बनण्याच्या एका स्वप्नामूळे कृतिकाला तिचा जीव गमवावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था
राजकूमार संतोषीपासून विक्रम भट्टपर्यंत ‘हे’ दिग्दर्शक त्यांच्याच अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते पागल
अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार
भिकारी बनणे संजीव कुमारला पडले महागात; दिग्दर्शकाने न ओळखताच सेटवरुन पळवून लावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.