बॉलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित, जाणून घ्या कारण..

मुंबई । बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार याच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर लग्न करतात. काहीजण याला अपवाद असतात. मात्र काहींची लग्नगाठ जास्त दिवस टिकते, तर काहीजण लगेच वेगळे देखील होतात. याची अनेक उदाहरणे बोलीवूडमध्ये बघायला मिळतात.

बोलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना आजही अविवाहित आहे. अक्षय खन्नाचे वय ४० पेक्षा जास्त झाले आहे. मात्र त्याने अद्याप लग्न केलेले नाही. किंवा त्याचे प्रेमप्रकरण देखील ऐकायला मिळालेले नाही. असे असले तरी त्याच्या ताल चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याचे एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडले होते. ही अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. करिश्मावर अक्षयचे जीवापाड प्रेम होते. त्याने ही बाब वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिश्मा पसंत होती. ते लगेच करिश्माच्या घरी गेले आणि रणधीर कपूर यांच्याकडे अक्षय-करिश्माच्या लग्नासाठी बोलणी केली.

करिश्माच्या वडिलांना देखील हे मान्य झाले. मात्र त्यांची पत्नी बबिता यांना हे मान्य नव्हते. करिश्मा देखील तेव्हा अनेक सुपरहिट चित्रपट देत होती. तिची टॉपच्या अभिनेत्रींसोबत गणना केली जात होती. यामुळे ती चर्चेत असायची. मात्र यशाच्या शिखरावर असताना लग्न केले तर करियर बरबाद होईल. असे तिच्या आईचे म्हणणे होते.

त्यामुळे हे लग्न होऊ शकले नाही. मात्र असेही म्हटले जाते की, अक्षय ऐवजी करिश्माचे अभिषेक बच्चनसोबत लग्न व्हावे असे बबिता यांना वाटत असल्याने त्यांनी हे लग्न होऊ दिले नाही. यामुळे अक्षय अविवाहित आहे. असे सांगितले जाते.

करिश्माचा त्यानंतर अभिषेकसोबत साखरपुडा झाला होता. आणि तो काहीच महिन्यात मोडला. साखरपुडा मोडल्यानंतर करिश्माने संजय कपूर या व्यवसायिकासोबत लग्न केले. पण दोन मुलांच्या जन्मानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यामुळे बॉलीवूडमध्ये लग्न जास्त दिवस टिकत नाही असे बोलले जाते.

ताज्या बातम्या

आई म्हणायचं की राक्षस! प्रियकरासोबत मिळून पोटच्या पोराचा काढला काटा, प्रेमात ठरत होता अडसर

लाज सोडली! अंत्यसंस्काराला एकही आला नाही; मात्र दहाव्याला जेवायला १५० जण हजर

उद्धव बेटा आमचा वृद्धाश्रम उध्वस्त झालाय, आम्हाला मदत कर; मुख्यमंत्र्यांच्या शिक्षकेची आर्त हाक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.