ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे(Shane Warne) शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याने क्रिकेटमध्ये १००० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियचा माजी खेळाडू शेन वॉर्न कोह सामुई, थायलंड येथील एका व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.(bollywood actors twwet on shane warne death)
ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनामुळे क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. यानंतर मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेन वॉर्नच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शेन वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करत लिहिले की, “शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. हे खूप हृदयद्रावक आहे, ओम शांती.”
https://twitter.com/akshaykumar/status/1499762672610398210?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1499762672610398210%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fbollywood-celebritiez-tweets-on-shane-warne-death%2F
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी देखील शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत लिहिले की, “महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. मैदानावर तो जादुई होता. त्यांना लंडनमधील एका हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटण्याचे सौभाग्य मला मिळाले. तो खरच सहज हसायचा. RIP, आम्ही तुम्हाला नेहमीच स्मरणात ठेऊ.”
https://twitter.com/AnupamPKher/status/1499764380078010368?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1499764380078010368%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fbollywood-celebritiez-tweets-on-shane-warne-death%2F
त्याचबरोबर दक्षिणेतील दिग्गज अभिनेता महेश बाबूनेही शेन वॉर्नच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहताना महेश बाबूने ट्विट केले आहे की, “या बातमीने मला धक्का बसला आणि दुःख झाले. जागतिक क्रिकेटसाठी हा अत्यंत दुःखद दिवस आहे. रेस्ट इन पीस रोड मोर्श आणि शेन वॉर्न. तुझी खूप आठवण येईल.”
https://twitter.com/urstrulyMahesh/status/1499767684732710916?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1499767684732710916%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fbollywood-celebritiez-tweets-on-shane-warne-death%2F
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहताना त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लिहिले की, “महान पुरुष जगतात.” यासोबतच तिने कॅप्शनसह हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि शेन वॉर्नने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी एकत्र काम केले होते.
https://twitter.com/TheShilpaShetty/status/1499755872066564098?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1499755872066564098%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fbollywood-celebritiez-tweets-on-shane-warne-death%2F
याशिवाय बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने देखील शेन वॉर्नला ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. अभिनेता अनिल कपूरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “या बातमीने माझ्यासारख्या लाखो लोकांना धक्का बसला आहे. तू खूप लवकर निघून गेलास. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.” अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
टायटन कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, १० हजार गुंतवणारा व्यक्ती झाला करोडपती
भारतीय गुंतवणूकदार कमावणार बक्कळ नफा, ‘या’ नवीन सुविधेने अमेझॉन, टेस्ला यांचे शेअर्स विकत घेता येणार
शेन वॉर्नकडे असणाऱ्या खास बॉल विषयी तुम्हाला माहित आहे का? नसेल तर नक्की वाचा