बॉलीवूडचे ‘हे’ कलाकार साखरपुडा झाल्यानंतर झाले होते वेगळे

बॉलीवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या अजरामर आहेत. तर काही प्रेम कहाण्या कधी पुर्ण होऊ शकल्या नाहीत. काही जणांनी साखरपुडा केला पण त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. जाणून घेऊया अशाच काही जोड्यांबद्दल

करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन – कपूर आणि बच्चन हे दोन्ही बॉलीवूडचे सर्वात मोठी घराणे आहेत. या दोन कुटुंबाना एकत्र आणण्याचे काम अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूरने केले होते. पण ते पूर्ण होऊ शकले नाही.

अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूरचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी सगळी मीडिया या दोघांच्या साखरपुड्यात उपस्थित होती. पण काही दिवसांनी या दोघांचा साखरपुडा तुटला आणि सर्वांना धक्का बसला.

सलमान खान आणि संगीता बीजलानी – सलमान खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. त्याचे सर्व अफेअर तेव्हा पण चर्चेत असायचे आणि आत्ताही चर्चेत असतात. पण त्याने अजूनही लग्न केले नाही.

करिअर सुरुवातीला सलमान खानने संगीता बीजलानीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. कारण सलमान खान आणि संगीता बीजलानी यांचा साखरपुडा झाला होता. पण काही दिवसांनी तो मोडला आणि या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. असे बोलले जाते की, संगीतामुळे आजही सलमान खानने लग्न केले नाही.

अक्षय कुमार आणि रविना टंडन – अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे खुप जास्त चर्चेत असतो. त्याचे सर्व चित्रपट सुपरहिट होतात. पण करिअरच्या सुरुवातीला तो त्याच्या अफेअरमूळे चर्चेत असायचा.

अक्षय कुमारने अभिनेत्री रविना टंडनसोबत साखरपुडा केला होता. पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात शिल्पा शेट्टीची एन्ट्री झाली. त्यामूळे त्याने रविनासोबत केलेला साखरपुडा मोडला होता.

महत्वाच्या बातम्या –
अर्जुन कपूरने सांगितले आई वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख; म्हणाला, सोळाव्या वर्षी १५० वजन झाले
‘या’ आहेत बॉलीवूडच्या सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्री; एक तर आहे फक्त पाचवी पास
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, हॉटस्टार बरोबर पण केलाय सौदा पक्का
बापरे! टेलिव्हिजनवरील सीता म्हणजेच दिपीका चिखलियाने केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.