बॉलीवूडच्या अभिनेत्रीच नाही तर ‘या’ अभिनेत्यांनी देखील केला आहे रंगभेदाचा सामना

जगभरात अनेक ठिकाणी रंगभेद केले जाते. त्यामूळे अनेकांना त्यांच्या सावळ्या रंगामूळे रंगभेदाचा सामना करावा लागतो. भारतात देखील रंगभेद केले जाते. फक्त सामान्य जनताच नाही तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील रंगभेद केले जाते. त्यामूळे कलाकारांना इंडस्ट्रीत काम मिळणे कठिण होते.

बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींना रंगभेदाचा सामना करावा लागला होता. त्यांना त्यांच्या सावळ्या रंगामूळे चित्रपटातून काढून टाकण्यात आले. फक्त अभिनेत्रीच नाही तर अनेक अभिनेत्यांनी देखील रंगभेदाचा सामना केला आहे. जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल.

रणवीर सिंग – आज बॉलीवूडचा टॉपचा अभिनेता असणाऱ्या रणवीर सिंगला देखील करिअरच्या सुरुवातीला रंगभेदाचा सामना करावा लागला होता. त्याने स्वत या गोष्टीबद्दल सांगितले होते. सावळा रंग असल्यामूळे रणवीरला अनेक चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

मनोज बाजपेयी – टेलिव्हिजनवरुन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेल्या मनोज बाजपेयीने देखील सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्याला इंडस्ट्रीमध्ये जागा बनवणे सोपे नव्हते. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, जुबेदा चित्रपट रिलीज झाला त्यावेळी त्याच्या अभिनयाची खुप प्रशंसा करण्यात आली होती. पण त्यासोबतच त्याच्या लुक्सचे जोक बनवण्यात आले. मनोज राजकूमार वाटत नाही. त्याचे लुक्स राजकूमारासारखे नाहीत.

नवाजउद्दीन सिद्दीकी – आज इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेते नवाजउद्दीन सिद्दीकीने देखील एकेकाळी रंगभेदाचा सामना केला होता. सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपट तर सोडा पण त्यांना टेलिव्हिजनवर देखील कोणी काम द्यायला तयार नव्हते. त्यांना दिग्दर्शक गोऱ्या रंगासाठी क्रिम वापरायला सांगायचे. गोऱ्या अभिनेत्री तर त्यांच्यासोबत काम करायला नकार द्यायच्या. पण त्यांनी सगळ्या गोष्टींकडे दुलर्क्ष करुन कामावर लक्ष दिले.

राजकूमार राव – आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या राजकूमार रावचे नाव देखील या यादीत येते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी अनेकदा रिजेक्शनचा सामना केला आहे. दिग्दर्शक त्यांचा चेहरा बघूनच त्यांचा हकलून द्यायचे. त्यांच्या सावळ्या रंगामूळे त्यांना कोणीच काम द्यायला तयार नव्हते.

महत्वाच्या बातम्या –
‘देवमाणूस’ मालिकेतील सरूआज्जीने केले आहे ‘या’ हिंदी सिनेमात काम; तेही सलमान खानसोबत
एकेकडे डिंपल कपाडीया आणि राजेश खन्नाचे लग्न सुरु होते तर दुसरीकडे डिंपलच्या आई रडत बसल्या होत्या कारण…
…म्हणून मुलाच्या लग्नात दुखी होत्या शर्मिला टागोर; स्वत: सांगितले कारण
करिअरसाठी अभिनेत्री रिना रॉयला द्यावे लागले अनेक बोल्ड आणि न्यूड सीन्स अभिनेत्रीने केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.