Share

Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याने केलं श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन, भावनिक पोस्ट करत म्हणाला..

Swami Samarth Paduka Pujan

Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: अध्यात्म आणि भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाम मशाळकर (Sham Mashalkar) याचं नाव अलीकडे चर्चेत आलं आहे.  बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता शाम मशाळकर (Sham Mashalkar) यांनी आपल्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) यांच्या पवित्र पादुकांचं श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजन केल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या पूजनानंतर मिळालेल्या आध्यात्मिक अनुभवाबद्दलही लिहिलं आहे.

शाम मशाळकर हे ‘जब वी मेट (Jab We Met)’, ‘अजब प्रेम की गजब कहानी (Ajab Prem Ki Ghazab Kahani)’, ‘हाऊसफुल ४ (Housefull 4)’, ‘पानीपत (Panipat)’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या विनोदी आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या पूजनाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका गुरुमंदिर, अक्कलकोट (Akkalkot) येथून स्वामींच्या पवित्र पादुका त्यांच्याघरी नेण्यात आल्या होत्या. सायंकाळी त्रिसंध्येच्या वेळी हे पूजन करण्यात आलं. या प्रसंगी शाम मशाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्रद्धेने सहभागी होत स्वामींचं विधिपूर्वक पूजन, अभिषेक व नैवेद्य अर्पण केला.

सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं, “आमच्या घरी काल तिन्हीसांजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका गुरुमंदिर (श्री बाळप्पा मठ) अक्कलकोट यांचे पूजन झाल्यानं प्रसन्न वाटलं. स्वामींची कृपा.”

या व्हिडीओ पोस्टनंतर अनेक भक्तांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून सोशल मीडियावर हा भावनिक क्षण मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sham Mashalkar (@shammashalkar)

स्वामी समर्थांचे भक्तगण अनेक घरांमध्ये पादुकांचं पूजन करतात. अशा पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा, भक्तीभाव व समाधान निर्माण होतं, असा विश्वास स्वामीभक्तांचा आहे. अशाच भक्तिभावाने पूरित झालेला अनुभव बॉलिवूडच्या या कलाकाराने शेअर करत भक्तांचे लक्ष वेधलं आहे.

ताज्या बातम्या धार्मिक मनोरंजन

Join WhatsApp

Join Now