बाॅलीवूड अभिनेता अवघ्या चारच दिवसांत झाला कोरोनामुक्त! त्यामागील कारणही सांगीतले

मुंबई । देशात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राजकीय नेते तसेच अनेक बॉलीवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाललाही कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर चारच दिवसात त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, याबाबत त्याने स्वता माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

यामध्ये तो लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घ्यायचे आवाहनही करत आहे. यात तो म्हणतो, जे त्रासातून जात आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी मी प्रार्थना करत आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या दोन चाचण्या केल्या, त्या दोन्ही निगेटिव्ह आल्या आहेत. माझ्या डॉक्टरांनी मला या मागचे एक महत्त्वाचे कारण सांगितले.

तो म्हणाला, मी लवकर बरा झालो कारण मी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यामुळेच मला जास्त त्रास झाला नाही, तसेच काही लक्षणंही दिसली नाहीत. मी सर्वांना लवकरात लवकर लस घेण्याची आणि सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची विनंती करत आहे.

तसेच तो म्हणाला तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. सकारात्मक राहा. हा वेळही निघून जाईल, असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तो आता ठणठणीत बरा झाला आहे.

१८ एप्रिलला त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याला कसलीही लक्षणे नव्हती. लस घेतल्यामुळे त्याला त्रास झाला नाही, लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. असे देखील माहितीवरून समोर आले आहे.

ताज्या बातम्या

कोरोनाची लागण झाली अन्  बरा होताच  झाला  करोडपती, वाचा संपुर्ण किस्सा

“दोन कानाखाली लावेल”; आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या मुलाला भाजप खासदाराची धमकी

ऑक्सिजन तुडवड्यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार मैदानात; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.