राजेश खन्नाचा खुप मोठा फॅन होता ‘हा’ अभिनेता; त्यांना भेटण्यासाठी बनला होता इलेक्ट्रिशीयन

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत एका पेक्षा एक अभिनेते होऊन गेले. पण काही कलाकारांची जागा मात्र कोणीही घेऊ शकत नाही. असेच एक अभिनेते म्हणजे राजेश खन्ना. त्यांच्यासारखे स्टारडम आणि चाहता वर्ग इंडस्ट्रीमध्ये दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला लाभले नाही.

भारतासोबतच भारता बाहेरही काकांचा खुप मोठा चाहता वर्ग होता. सामान्य माणसचं नाही तर कलाकार देखील काकांचे चाहते होते. असाच एक अभिनेता म्हणजे इरफान. इरफान खान आज आपल्यामध्ये नाही. पण त्याच्या आठवणी सदैव आपल्या सर्वांसोबत राहतील.

इरफानचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. पण इरफान मात्र नेहमीपासूनच राजेश खन्नाचा फॅन होता. बॉलीवूडमध्ये येण्याअगोदरपासून तो त्यांना फॉलो करायचा. एकदा तर इरफानने सगळ्या सीमा पार केल्या होत्या. राजेश खन्नाला भेटण्यासाठी तो त्यांच्या बंगल्यात गेला होता. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर इरफान खानला खुप मेहनत घ्यावी लागली होती. त्याला सहजासहजी हे यश मिळाले नव्हते. सुरुवातीचे दिवस तर त्यांच्यासाठी खुपच कठिण होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे करुन त्यांचे पोट भरले होते.

अनेक दिवस इरफान खान मुंबईत इलेक्ट्रॉनिक्सचे काम करत होता. हे काम करत असताना इरफानला एकदा राजेश खन्नाच्या बंगल्यात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांचा आनंद गगणान मावत नव्हता. इरफान एवढे आनंदी झाले होते की, त्यांनी नाचायला सुरुवात केली.

हे बघून त्यांच्या सोबत असणारी सगळी लोकं थक्क झाली होती. इरफानने सगळे सामान घेतले आणि ते राजेश खन्नाच्या बंगल्याकडे निघाले. त्यांच्या बंगल्यातला एसी खराब झाला होता. तोच रिपेअर करण्याचे काम इरफानला भेटले होते.

बंगल्यात पोहोचल्यानंतर इरफानला स्वर्गात आल्याची जाणीव होत होती. त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. बंगल्यात गेल्यानंतर त्यांनी सगळीकडे इरफान खानला शोधायला सुरुवात केली होती. पण त्यांना कुठेही काका दिसले नाहीत.

शेवटी त्यांनी घरातील नोकरांना काकांबद्दल विचारले. त्यावेळी त्यांना समजले की, काका बाहेर गेले आणि रात्री परत येतील. हे ऐकताच इरफानला दुख झाले. कारण ते फक्त राजेश खन्नाला भेटण्यासाठी बंगल्यावर गेले होते. पण त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

इरफान खानने एसी नीट केला आणि घरी परत आले. अनेक वर्षांनंतर त्यांनी एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांना इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर राजेश खन्नाला भेटण्याच्या संधी मिळाल्या पण त्यांच्यासोबत काम करता आले नाही.
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी
करिअर फ्लॉप पण बायको मात्र टॉप क्लास; खुपच सुंदर आहेत फ्लॉप अभिनेत्यांच्या बायका; पहा फोटो
करिअर वाचवण्यासाठी स्वत: च्याच चित्रपटाचे तिकीट खरेदी करत होता ‘हा’ अभिनेता
‘बाहुबली’तलं माहिष्मती साम्राज्य काल्पनिक नाही, याठिकाणी आहे खऱ्या अस्तित्वाची नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.