आता मृत्यू जवळ आला आहे…; बॉलिवूडचा खलनायक कोरोनाचा हाहाकार पाहून घाबरला

मुंबई | देशात गेल्या वर्ष भरापासून कोरोनाने कहर केला आहे. ऑक्सिजनचा साठा, रेमेडीसीवर इंजेकशन्सचा तुटवडा आणि अपुरी आरोग्य सुविधा यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोरोनाने फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते, क्रिडा क्षेत्रातील खेळाडू या सर्वांनाच ग्रासले आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांचा अत्यंत धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत आहे. देशात काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसत आहे. कोरोनामुळे देशभरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अशातच बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपुर यांनी देशातील परिस्थीती पाहून भीती वाटते. मृत्यू खुप जवळ आला आहे. असं म्हणतं चिंता व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते शक्ती कपुर म्हणाले, “हे वर्ष फार कठीण आहे. मृत्यू आता जवळ आला आहे. पुर्वी लोकं म्हणायची मी आता मरणार आहे पण पुढचे दहा वर्ष जगायची. पण आता मृत्यू काय आहे? आज लोकं माश्यांसारखी मरत आहेत. मृत्यू खुप सोपा झाला आहे”.

पुढे म्हणाले, “परिस्थीती हाताबाहेर चालली आहे. लवकरात लवकर कोरोनाची लस घ्या. मी सुध्दा कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. आता लसच आपल्याला यापासून वाचवू शकते”. असं अभिनेता शक्ती कपुर यांनी म्हटलं आहे.

शक्ती कपुर यांनी हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका जास्त निभावल्या आहेत. काही चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका सुध्दा केल्या आहेत. बॉलिवूडमधील अनेक चित्रपट शक्ती कपुर यांच्या उत्कृष्ट भूमिकेमुळे चांगलेच गाजले आहेत.

कुली नंबर १, हम साथ साथ है, भाई, मालामाल वीकली, महाराजा, टारझन ग वंडर कार अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या आहेत. सोशल मिडियावर नेहमी शक्ती कपुर सक्रीय असतात.
महत्वाच्या बातम्या-
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट? अभिषेकने केला ‘हा’ मोठा खुलासा
धक्कादायक! बापाने २ वर्षाच्या पोटच्या मुलाला विकलं अन् गर्लफ्रेंडसोबत गेला मजा मारायला
गोलमाल फेम विकास कदमची बातच न्यारी; करतोय कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा भारी
करिअरसाठी अभिनेत्री रिना रॉयला द्यावे लागले अनेक बोल्ड आणि न्यूड सीन्स अभिनेत्रीने केला खुलासा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.