श्रावणबाळाची गोष्ट लहान असताना आपण सर्वांनी ऐकलीच असेल. असाच एक श्रावणबाळ आजच्या युगात आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी या आधुनिक काळातील श्रावणबाळाच्या संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत अभिनेते अनुपम खेर यांनी त्या श्रावणबाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.(bollywood actor anupam kher share photo of Shravanbal twitter)
या फोटोमध्ये या आधुनिक काळातील श्रावणबाळाबाबत माहिती देण्यात आली आहे. या फोटोमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या आधुनिक काळातील श्रावणबाळाचे नाव कैलास गिरी ब्रह्मचारी असे आहे. गेल्या २० वर्षांपासून कैलास गिरी ब्रह्मचारी आपल्या ८० वर्षीय दृष्टिहीन आईला तीर्थयात्रेला घेऊन जात आहेत.
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी कैलास गिरी ब्रह्मचारी यांना मदत करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “या फोटोमधील माहिती खूप भावुक करणारी आहे. ही माहिती खरी असावी अशी अशा आहे. या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया आम्हाला कळवा. अनुपम केअर्स फाउंडेशन त्यांना देशातील कोणत्याही तीर्थयात्रेसाठी मदत करेल.”
https://twitter.com/AnupamPKher/status/1543806279642411008?s=20&t=FDqklQaqZlBg8XpGzmULrA
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने या ट्विटवर कमेंट करत लिहिले की, “या व्यक्तीबद्दल करुणा दाखवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “अनुपम खेर सर तुम्हाला सलाम, तुमच्या दयाळूपणाचे खूप कौतुक वाटते.”
तसेच आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “अनुपम खेर सर तुम्ही नेहमीच चांगल्या गोष्टींसाठी पुढाकार घेता, आम्हाला तुमचा अभिमान आहे.” अनेकांनी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचे हे ट्विट लाइक केले आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी हे ट्विट रिट्विट देखील केले आहे. सध्या अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टची चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आता पुढचं गाणं कधी? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘काही महिन्यात ‘एवढी’ गाणी रिलीज करणार’
VIDEO: कोरोनाकाळात कुठंच काम भेटेना, रानू मंडलने केला असा डान्स, चाहत्यांनीही केले कौतुक
धक्कादायक! अटक टाळण्यासाठी चोराने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यु