पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारची देशाच्या नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण केलं आहे. हा अशोक स्तंभ सुमारे २० फूट उंच असल्याची माहिती मिळत आहे. पण या नवीन अशोक स्तंभावरून आता वाद सुरु झाला आहे. अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार जवाहर सरकार यांनी नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “देशाचं राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाचा अवमान करण्यात आला आहे’, असे खासदार जवाहर सरकार यांनी सांगितले आहे. आता बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही या वादात उडी घेतली आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी नवीन अशोक स्तंभाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, “नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील आहे. सिंहाला दात जास्त असतील तर तो दाखवणारच ना. गरज लागली तर तो चावेल सुद्धा. जय हिंद”, असे ट्विट अभिनेते अनुपम खेर यांनी केले आहे.
https://twitter.com/AnupamPKher/status/1547077869654126592?s=20&t=WUA1hfvPMCuNRuJT51Pr6Q
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. “मी १३० कोटी भारतीयांना विचारू इच्छितो की जे राष्ट्रीय चिन्ह बदलतात त्यांनी “देशद्रोही” बोलावे की नाही?”, असा सवाल आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला होता.
लेखक, विचारवंत दिलीप मंडल यांनी देखील नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. , विचारवंत दिलीप मंडल यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये लेखक दिलीप मंडल यांनी लिहिले की, “अशोक स्तंभाचे मूळ रूप सारनाथ संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. अशोक स्तंभाची मूळ प्रतिमा टपाल तिकिटांपासून ते सरकारी कागदपत्रांवर आहे.”
मूळ अशोक स्तंभावर सिंह शांत मुद्रेत आहे. पण पंतप्रधानांनी नवीन संसद भवनात स्थापन केलेल्या अशोक स्तंभावर सिंह रागीट मुद्रेत आहे”, असे लेखक दिलीप मंडल यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते. सोशल मीडियावर देखील नवीन अशोक स्तंभावरून दोन गट पडले आहेत. एक गट नवीन अशोक स्तंभाचे समर्थान करत आहे. तर दुसरा गट नवीन अशोक स्तंभाचा विरोध करत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यमुळे काँग्रेस नाराज; थोरात म्हणाले, पाठिंबा देण्याआधी…
‘ग्रीन टी मधून गुंगीचे औषध देऊन…’, श्रीकांत देशमुखांचा मोठा खुलासा
रोहित शर्माच्या सिक्सरने चिमुकली झाली जखमी, नंतर हिटमॅनने दिले तिला ‘हे’ खास गिफ्ट