Share

बॉलिवूड अभिनेते अमिताभ यांचं निधन, मृत्यूच्या ४ दिवस आधीचा व्हिडीओ झाला व्हायरल

amitabh-dayal.j

हिंदी चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. ‘कागर: लाइफ ऑन द एज’ सारख्या चित्रपटात काम केलेले अभिनेते अमिताभ दयाल(Amitabh Dayal) यांचे निधन झाले आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजता त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेते अमिताभ दयाल मृत्यूसमयी ६१ वर्षांचे होते.(bollywood actor amitabh passed away)

अमिताभ दयाल यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरीपासून(Om Puri) अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) आणि जॉन अब्राहम यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अमिताभ दयाल यांनी ‘धूम’, ‘रंगदारी’ आणि ‘ये दिल्लगी’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

अभिनेता अमिताभ दयाल यांच्या मृत्युबद्दलची माहिती त्यांची पत्नी मृणालिनी पाटील यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ दयाल गेल्या १३ दिवसांपासून आजारी होते. १७ जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नंतर तपासणीत ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. शनिवारी डॉक्टरांनी अमिताभ दयाल यांना उपचारानंतर कोरोनामुक्त घोषित केले होते. पण आज पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. २००० मध्ये अमिताभ दयाल यांनी मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केले होते.

मात्र, लग्नाच्या ९ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांना दोन मुले आहेत. अमिताभ दयाल यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य बिलासपूरमध्ये राहतात, सध्या ते मुंबईत येण्याची वाट पाहत आहेत.अमिताभ दयाल यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांची पत्नी मृणालिनी पाटील यांनी दिली आहे.

अमिताभ दयाल यांनी ओम पुरी आणि नंदिता दास यांच्यासोबत ‘कागर: लाइफ ऑन द एज’ (२००३ ) या चित्रपटात काम केले होते. तसेच अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि संजय दत्त यांच्यासोबत ‘विरुद्ध’ चित्रपटातही काम केले होते. आजारी असताना रुग्णालयातून त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये मृत्यूशी झुंज देतानाही हार मानायाची नाही, असे म्हणत त्यांनी जीवन जगण्याचा मंत्र दिला होता.

महत्वाच्या बातम्या :-
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल; लग्नाबाबत विचारल्यावर म्हणाले..
मोठी बातमी! नितेश राणेंनी हायकोर्टातील जामीन याचिका घेतली मागे; चौकशीला जाणार सामोर
माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या तळघरात सापडले कोट्यवधी रुपये, आयकर विभागाची मोठी कारवाई

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now