दुख:द बातमी! अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचे निधन; वयाच्या ७७ वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचे निधन झाले आहे. अक्षयकुमारच्या आई अरुण भाटिया यांच्यावर मुंबईतल्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु होते काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने अक्षय कुमार शूटिंग सोडून मुंबईला आला होता.

अक्षय कुमारने आईबद्दल इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे की, ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे माझी आई अरुणा भाटिया यांनी सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात केलेल्या प्रार्थनांचा आदर करतो ओम शांती अशा शब्दात त्याने आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. अरुणा भाटिया या निर्मात्या असून त्यांनी बॉलीवूडच्या काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये रुस्तम, हॉलिडे अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आईच्या प्रकृतीविषयी नुकतीच एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकली होती.

यामध्ये चाहत्यांनी त्याच्या आईसाठी प्रार्थना केल्या होत्या. यामुळे अक्षय कुमारने त्यांचे आभार व्यक्त केले होते. अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, “माझ्या आईच्या प्रकृतीविषयी तुम्ही ज्याप्रकारे काळजी व्यक्त केली, त्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही अतिशय कठीण वेळ आहे. तुमच्या प्रार्थनांची फार गरज आहे.”

काही दिवसांपूर्वीच मातृदिनानिमित्त अक्षय कुमारने त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अक्षय आपल्या आईला मिठी मारून कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आईसारखे कोणी नाही”

अक्षय कुमार यूकेमध्ये त्याच्या आगामी चित्रपट “सिंड्रेला” याचे शूटिंग करत होता. वैयक्तिक काम असलं तरी कामावर याचा परिणाम होऊ नये याची काळजी त्याने घेतली. चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावर सोडल्यानंतर अक्षय कुमारने निर्मात्याला त्याची आवश्यक नसलेल्या दृशांच्या शूटिंगचे काम चालू ठेवण्यास सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या
“मराठीला अभिजात दर्जा मिळावा हा प्रस्ताव केंद्रात पाठवून ८ वर्ष झाली, मोदींचा मंत्री खोटं बोलतोय”
रवी शास्त्री, विराट कोहलीवर बीसीसीआय नाराज, कारवाई होण्याची शक्यता, काय आहे प्रकरण, वाचा..
पोटच्या पोरीला मारून दांपत्याने स्वतः केली आत्महत्या, घटनेने राज्यात खळबळ
पोटच्या पोरीला मारून दांपत्याने स्वतः केली आत्महत्या, घटनेने राज्यात खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.