टॉपलेस फोटोशुट केल्यामूळे लोकांनी अभिनेत्रीला दिली होती जीवे मारण्याची धमकी

९० च्या दशकातील बोल्ड आणि ब्यूटीफुल अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीला ओळखले जाते. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामूळे आजही तिचा चाहता वर्ग तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत.

१९९२ मध्ये ममताने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. तिने तिच्या दिलखेच अदांनी आणि बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

अनेक हिट चित्रपट करणारी ममता पहील्या चित्रपटानंतर मोठ्या वादाच्या भवऱ्यात अडकली होती. त्यामूळे तिला चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली होती. पण या प्रसिद्धीचा फायदा तिला करिअरमध्ये झाला नाही.

कारण ममत कुलकर्णी एका टॉपलेस फोटोमूळे चर्चेत आली होती. १९९३ मध्ये ममताने स्टारडस्ट मॅगजीनसाठी एक टॉपसेल फोटो शुट केला होता. हा फोटो लोकांसमोर आल्यांतर लोकं तिच्यावर खुप जास्त भडकली होती.

ममता फिल्म इंडस्ट्रीतील पहीली अभिनेत्री होती जिने टॉपलेस फोटोशूट केला होता. तो फोटो मॅगजीनच्या कव्हर पेजवर छापून आल्यानंतर देशभरात गोंधळ उडाला होता. ममताचा निषेध करण्यासाठी आणि तिला इंडस्ट्रीतून बाहेर काढण्यासाठी लोकं रसत्यावर उतरली होती.

त्या काळात ममतामूळे अनेक अंदोलन झाले होते. लोकांनी तिचे चित्रपट रिलीज होऊ दिले नव्हते. पण या सर्व गोष्टींचा ममतावर काहीही फरक पडला नाही. ती इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली.

बोल्ड आणि ब्यूटीफुल ममता कुलकर्णी ९० च्या दशकामध्ये तिच्या करिअरच्या टॉपवर होती. पण तिचे हे करिअर लवकरच खराब झाले. कारण तिच्या आयुष्यात डॉन विक्की गोस्वामीची एन्ट्री झाली.

विक्कीच्या एन्ट्रीनंतर ममता चित्रपटांपासून लांब गेली. विक्कीने आणि ममता कुलकर्णीने लग्न देखील होते. पण दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. आज ती लाइमलाईटपासून दुर आहे.

महत्वाच्या बातम्या –

तुम्हाला सुंदर बायको मिळाली, पण तुम्ही त्या लायकीचे नाहीत; अभिषेक बच्चनवर भडकला नेटकरी

अभिनेत्री लिसा हिडेन तिसऱ्यांदा होणार आई; व्हिडिओ शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

कोण अमिताभ बच्चन? म्हणत राजेश खन्नाने केला होता अमिताभचा अपमान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.