माधूरी दिक्षित आणि आयशा जुल्कासोबत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्री बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक

२०२१ हे वर्ष बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी खुप खास ठरणार आहे. कारण या वर्षामध्ये अनेक नवीन चेहरे बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहेत. नवीन चेहऱ्यांसोबतच स्टार किड देखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. त्यामूळे हे वर्ष खुस खास असणार आहेत.

त्यासोबतच ९० चे दशक गाजवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री देखील कमबॅक करणार आहेत. त्यामूळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. एक दोन नाही तर अभिनेतत्री २०२१ मध्ये कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये आहेत.

८० आणि ९० च्या दशकामध्ये अनेक सुंदर अभिनेत्रींनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण त्यानंतर मात्र त्या इंडस्ट्रीतून गायब झाल्या होत्या. आत्ता मात्र त्या परत एकदा कमबॅकसाठी सज्ज झाल्या आहेत. जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री.

नीतू कपूर – या यादीत सर्वात पहीले नाव येते ते म्हणजे नीतू कपूरचे. अनेक वर्षांनंतर नीतू कपूर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. नीतू कपूर धर्मा प्रोडक्शनच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

भाग्यश्री – ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून रातोरात स्टार झालेली भाग्यश्री अनेक वर्षांपासून फिल्मी दुनियेपासून दुर आहे. पण या वर्षात ती कमबॅक करणार आहे. तिच्या या कमबॅकसाठी चाहते देखील खुप उत्साही आहेत.

भाग्यश्री कंगना राणावतच्या ‘थलावी’ चित्रपटातून फिल्मी पडद्यावर एन्ट्री प्रवेश करणार आहे. त्यासोबतच ती बाहूबली स्टार प्रभास आणि पुजा हेगडेच्या ‘राधे श्याम’ चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.

शिल्पा शेट्टी – १४ वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी कमबॅक करत आहे. त्यामूळे तिचे हे कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी खुप खास आहे. २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘अपने’ चित्रपटामध्ये शिल्पाने अभिनय केला होता. त्यानंतर ती आत्ता निक्कमे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आयशा जुल्का – ‘जो जिता वही सिंकदर’ चित्रपटातून सुपरस्टार झालेल्या आयशाने तरुणांची झोप उडवली होती. पण ९० चे दशक संपेपर्यत आयशा बॉलीवूडपासून दुर गेली होती. आत्ता मात्र कमबॅक करणार आहे. आयशा चित्रपटातून नाही तर वेबसीरीजच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे.

इशा देओल – धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची लाडली इशा देओल चित्रपटांपासून दुर गेली होती. बॉलीवूडमध्ये यश मिळाले नाही. म्हमून इशाने लग्न करुन संसाराला सुरुवात केली होती. पण आत्ता ती परत एकदा कमबॅक करणार आहे. लवकरच इशाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे.

माधूरी दिक्षित – टेलिव्हिजनवर आपल्या अंदानी सर्वांना घायाळ करणारी माधूरी देखील इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करायला तयार झाली आहे. पण यावेळेस ती चित्रपट नाही तर वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

वाचा रमेश व सीमा देव या सर्वाधिक गाजलेल्या जोडीची लव्हस्टोरी..

लग्नानंतर पहिल्यांदाच दिया मिर्झाने शेअर केले हॉट फोटो, नवऱ्यासोबत करतेय हनीमून एन्जॉय

बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करुन हेमा मालिनीने फेडले होते कर्ज; जाणून घ्या पुर्ण प्रकरण

अभिनेत्री लिसा हिडेन तिसऱ्यांदा होणार आई; व्हिडिओ शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.