‘या’ हिरोईनच्या प्रेमात पागल झाला होता बाॅबी देओल; पण केवळ वडीलांच्या इच्छेखातीर..

अनेक वेळा लोक प्रेम करतात. त्यांना त्या व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा असते. पण काही कारणांमुळे त्यांना लग्न करत येत नाही. कधी कधी तर त्यांच्या स्वतःच्या घरच्यांमुळे त्यांना लग्न करता येत नाही.

असेच एकदा अभिनेता बॉबी देओलसोबत झाले होते. बॉबी देओल ९० च्या दशकातील बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसीरिज झाली आहे.

या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलच्या कामाची खुप जास्त प्रशंसा केली जात आहे. त्याला बॉलीवूडच्या फ्लॉप अभिनेत्यांंपैकी एक समजले जाऊ लागले होते. पण या वेबसीरीजमुळे त्याच्या करिअरला वेगळे वळणं मिळाले आहे.

आज आम्ही तुम्हाला बॉबी देओलच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत. बॉबी देओलचे पहिले प्रेम बॉलीवूड अभिनेत्री नीलम कोठारी होती. या दोघांची मुलाखत एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली.

काही दिवसांनी या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनेक दिवस हे एकमेकांना डेट करत होते. मीडियामध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे लवकरच लग्न करतील असे बोलले जाऊ लागले होते.

ही गोष्ट बॉबी देओलच्या घरी समजली. तेव्हा मात्र धर्मेंद्र यांना खुप जास्त राग आला. कारण त्यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलांनी बॉलीवूड अभिनेत्रींशी लग्न करू नये. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करावे’.

या कालावधीमध्ये बॉबी देओल आणि नीलमच्या अफेअरच्या चर्चा खुप जास्त वाढल्या होत्या. त्यामूळे धर्मेंद्र खुप जास्त चिडले आणि त्यांनी बॉबी देओलला हे नाते संपवायला सांगितले. बॉबी देओल त्याच्या वडिलांना नकार देऊ शकत नव्हता.

त्यांनी धर्मेंद्रला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काहीही ऐकले नाही. त्यांनी बॉबी देओलला फॅमिली किंवा नीलम या दोघांपैकी एकाला निवडायला सांगितले. मग मात्र बॉबी देओल टेन्शनमध्ये आला.

बॉबी देओलने वडिलांच्या सांगण्यावरून नीलमसोबत असणारे पाच वर्षांचे नाते तोडले. नीलमने पण या गोष्टीला नकार दिला नाही. कारण तिला कोणालाही नाराज करून नवीन संसार सुरू करायचा नव्हता.

नीलमने स्वतः एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. नीलम म्हणाली की, ‘आम्ही दोघेही स्वतःच्या मर्जीने वेगळे झालो होतो. कारण आम्हाला आमच्या घरच्यांना नाराज करून नवीन संसाराची सुरुवात करायची नव्हती’.

बॉबी देओलने लग्नाची तयारी सुरू केली होती. पण वडिलांमूळे त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले होते. ब्रेकअपनंतर नीलमने आपल्या करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली. बॉबी देओलने पण बॉलीवूडमध्ये डेब्यु करण्याची तयारी सुरू केली.

महत्त्वाच्या बातम्या –

एकेकाळी ज्या अभिनेत्याला करिष्माने हाकलून दिले होते तो पुढे जाऊन बाॅलीवूडचा स्टार झाला

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

‘या’ कारणामुळे बाॅलीवूडची सर्वात हिट जोडी अक्षयकुमार-सुनील शेट्टी एकमेकांचे तोंडही बघत नव्हते

बापाने आश्रमात जायचा निर्णय घेतल्यावर पाच वर्षाच्या साध्याभोळ्या अक्षय खन्नाने काय केलते पहा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.