Share

..त्यामुळे मी त्या पेंटिंगला डोळे काढले, सात कोटींची पेंटींग खराब करणाऱ्या सुरक्षारक्षकाने केला खुलासा

security guard

रशिया शहरातील बोरिस शलोत्सवमधून एक वेगळच प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी आर्ट गॅलरी भरवण्यात आले होते. एका सुरक्षा रक्षकाची निवड करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे त्याचा पहिला दिवस होता. रशियाच्या स्वेर्डलोव्हस्क ओब्लास्ट प्रांतामधील येल्ट्सीन भागात ७ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे.

दिवसभर सुरक्षा रक्षकाचे काम करुन तो कंटाळला होता. पण त्या नादात त्याने असा पराक्रम केला की सगळेच जण हैराण झाले. त्याने कोट्यवधींच्या पेटींगवर पेनाने चित्र काढून पुर्ण पेंटींग खराब केली आहे. आता त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

मिळालेल्या माहितीनुसार, अलेक्झांडर हा निवृत्त लष्करी अधिकारी आहे. काही अल्पवयीन मुलींच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. “मला वाटलं ते चित्र त्या मुलींचंच आहे. मी त्यांना विचारलं, हे चित्र तुमचं आहे का? त्या म्हणाल्या हो. मग मी त्या चित्राला डोळे काढले. मला वाटलं की हे एक लहान मुलांनी काढलेलं चित्र आहे, असं देखील अलेक्झांडरनं सांगितलं.

तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “मी मूर्खच आहे की मी हे असं काहीतरी केलं. पण खरं सांगायचं तर मला ते चित्र अजिबात आवडलं नव्हतं. त्यामुळे फार नकारात्मक प्रभाव पडत होता, असे अलेक्झांडरनं सांगितले. याप्रकरणी अलेक्झांडरला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हे प्रदर्शन ७ डिसेंबर रोजी येल्ट्सिन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले. यावेळी कंटाळलेल्या सुरक्षा रक्षकाने पेंटींगवर बॉल पेनचे डोळे काढले. तेव्हा प्रदर्शन बघणारे लोक तिथे येत होते. त्यावेळी त्यांनी बघितले की तो सुरक्षा रक्षक बॉल पेनने त्या पेंटींगवर डोळे काढत होते. त्यानंतर तातडीने तिथल्या आयोजकांना बोलवण्यात आले आहे.

ही पेंटींग १९३२ ते १९३४ दरम्यान रशियन पेंटर ऍना लेपोर्स्काया द्वारा बनवण्यात आली होती. आता या पेटींगला नीट करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च लागू शकतो असे म्हटले जात आहे. या प्रकरणावर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी एक उपाय सुचवला आहे.

दरम्यान, चिंता कशाला करायची? असा सवाल महिंद्रांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. ट्विट करत महिंद्रा म्हणतात, “चिंता कशाला करायची? हे नवीन ‘क्रिएशन’ एनएफटीमध्ये कनव्हर्ट करा,” असं ट्विट आनंद महिंद्रांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

किरीट सोमय्यांचं खुलं आव्हान “संजय राऊत यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं की मुलीचे…”
“चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?”
प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्याने उडाली खळबळ
फिल्मी स्टाईलमध्ये भांग भरणारा तरुणच निघाला धोकेबाज; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now