कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या प्रसिद्ध रुग्णालयाला BMC देणार झटका; दाखल केली FIR

मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे खाजगी तसेच शासकीय रुग्णालय तुडुंब भरत आहेत. अशा परिस्थितीत पालिकेकडून रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

मात्र अनेक खासगी रुग्णालयांत रुग्णांची लूट सुरू असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यात पालिकेने आता कारवाईचा करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयावर पालिकेने कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याअंतर्गत FIR दाखल केली आहे.

पोलीस इन्स्पेक्टर श्रीराम कोरोगावार यांनी सांगितले की १ जुलै रोजी रामचंद्र कोब्रेकर यांनी नानावटी विरोधात FIR दाखल केली आहे.

रुग्णालयाकडून पीपीई किट्स, औषधं आणि कोरोना चाचणीसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात होते, असे सांगितले जात आहे. कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याचा आरोप या रुग्णालयांवर करण्यात आला आहे.

मुंबईतील विलेपार्लेतील नानावटी रुग्णालयाविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी FIR दाखल करुन घेतले आहे. मिररने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.