देवमाशाने केली उलटी आणि तो झाला करोडपती; सोन्यापेक्षा महाग का असते देवमाशाची उलटी?

एक नागरिक एका बेटावर फिरत होता. तिथे त्याला शेणासारखा एक दगड दिसला. पण त्याला ते काय आहे नेमकं कळत नव्हतं कारण त्या दगडातून सुगंध येत होता. मग त्याने तो दगड आपल्या बोटीत टाकून घरी आणला. आणि त्याच दगडामुळे तो श्रीमंत झाला.

तुम्हाला हे खोटे वाटेल पण हे खरे आहे. हे वृत्त काही दिवसांपूर्वी तैवाणच्या एका वेबसाईटवर प्रकाशित झाले होते. जेव्हा त्याने घरी येऊन त्या दगडाची माहिती काढली तेव्हा त्याला समजले की, हा दगड नसून ती देवमाशाची (blue whale) ची उलटी आहे.

ती उलटी समुद्रात राहून दगडासारखी कडक झाली होती. या दगडाला एम्बरग्रीस म्हणतात. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सोन्यापेक्षा महाग आहे. तब्बल ४ किलोचा हा दगड त्याने विकला आणि त्याला १.५ कोटी रुपये मिळाले.

तर ही उलटी तयार कशी होते? देवमाशाच्या शरीरात एक मेणासारखा पदार्थ तयार होतो. जो त्याला squid या जलचर प्राण्याच्या काट्यांपासून वाचवतो. हा पदार्थ देवमासा उलटीतून किंवा विष्टेतून बाहेर टाकतो.

हा पदार्थ बाहेर पडल्यानंतर समुद्राच्या पाण्यामुळे आणि वातावरणामुळे कडक होतो. काही जण त्याला माशाची उलटी किंवा माशाची विष्ठा म्हणतात. एम्बरग्रीसला काही वर्षांनंतर खूप सुंदर वास यायला लागतो. हा पदार्थ ज्वलनशील असतो.

बहुतेकवेळा अत्तर आणि सुगंधी उत्पादनात त्याचा वापर होतो. ग्रीसच्या प्राचीन संस्कृतीत लोक त्याच्यापासून सुगंधित सिगरेट तयार करत असत. खाद्यपदार्थ स्वाद वाढवण्यासाठी, लैगिक क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर केला जात असे.

तसेच मध्य युगात युरोपात डोकेदुखी, सर्दीवरच औषध म्हणून याचा वापर केला जात असे. अजूनही एम्बरग्रीस वापरले जाते त्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत जास्त आहे. जेवढं जुन एम्बरग्रीस तेवढी त्याची किंमत वाढते. तज्ञ त्याला तरंगणारे सोने म्हणतात.

त्याचे वजन १५ ग्रॅम ते ५० किलोपर्यंत असते. सामान्यतः देवमासा खोल समुद्रात राहतो. किनाऱ्यावर तो क्वचितच येतो. पण त्याने जर उलटी केली तर ती किनाऱ्यावर वाहत येते. मच्छिमार त्याच्या शोधात असतात.

काही दिवसांपूर्वी मुंबईत आणि देशात अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे मारले त्यामध्ये एम्बरग्रीस सापडले होते. देवमाशाची उलटी मच्छिमाराचे आयुष्य बदलून टाकते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.