RTO : RTO अधिकाऱ्याच्या घरी सापडला खजिना, पगारापेक्षा ३ पट संपत्ती, आकडा वाचून हादराल

RTO : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका अधिकाऱ्याच्या घरी प्रचंड संपत्ती असल्याचे समोर आले आहे. हा एक RTO अधिकारी आहे. या अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकण्यात आली असून त्याच्याकडे उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त संपत्ती आढळली आहे.

RTO अधिकारी संतोष पाल सिंग याच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असता त्याच्याकडे प्रचंड काळा पैसा असलेला आढळून आला. यावेळी तपासादरम्यान त्याची अनेक आलिशान घरे, महागड्या गाड्या आणि इतर मालमत्ता सापडली आहे. तसेच त्याच्या घरातून उत्पान्नापेक्षा ६५० पट जास्त किमीतीची मालमत्ता मिळाल्याचे बोलले जात आहे.

संतोष पाल सिंग याच्या शताब्दीपूरम येथील आलिशान घरावर आणि गार्हा फाटक येथील त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीवर ईओडब्ल्यूच्या पथकांनी एकाच वेळी धाड टाकली. यावेळी सहा घरे, फार्महाऊस, आलिशान गाड्या तसेच १६ लाख रकमेसह लाखांचे दागिने असल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. ईओडब्ल्यूच्या या धाडीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

यासोबतच तपासात समोर आलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले की, आरटीओ संतोष पाल सिंग यांच्या सेवा कालावधीत वैध स्त्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांचा खर्च आणि संपादित मालमत्ता ६५० टक्के आहे. तसेच ते ३०० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक असल्याचीही चर्चा आहे.

गेल्या काही वर्षांत संतोष पाल सिंग यांच्या विरोधात अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात बनावट जात प्रमाणपत्र, गांजा विक्रीच्या खोट्या आरोपाखाली ऑटोचालकाला धमकी देणे, नोंदणी, परवाना, परमिट यासह व्हीआयपी क्रमांकाचे मनमानी शुल्क आकारणे, कमिशन घेणे अशी अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. RTO मध्ये असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली असल्याचे समोर आले आहे.

कागदपत्रांच्या तपासानुसार, त्यांच्या नावावर शंकर शाह वॉर्डात ११५० चौरस फूट, शताब्दीपूरम येथे १० हजार स्क्वेअर फूटच्या दोन निवासी इमारती, कस्तुरबा गांधी वॉर्डमध्ये ५७० स्क्वेअर फूट आणि गडफाटक येथे ७७१ स्क्वेअर फूट घर, याशिवाय चारागा रोड गावातील १.४ एकर जमीन आहे. तसेच त्यावर बांधलेल्या फार्म हाऊसचीही माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या
Twins : आईच्या डोळ्यांसमोर दोन जुळ्या मुलांनी सोडला जीव, मग प्रशासनाला आली जाग, वाचून हादराल
शिवसेनेची गळती सुरूच, नागपूरातून मोठा धक्का देत ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर
दहिहंडी प्रेमींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, शासकीय योजनांचा लाभ अन् क्रिडा प्रकारात होणार समावेश
वर्दीमध्ये सुंदरी! ‘या’ महिला IAS चं सौंदर्य पाहून मोठमोठ्या अभिनेत्रींना जाल विसरून, पहा फोटो