सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून काही संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीही दिली होती. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athvale) यांनी मत व्यक्त केलं आहे.(BJP’s Union Minister opposes providing security to Raj Thackeray)
“राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही. त्यामुळे ते अशा भूमिका घेतात. त्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज नवी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
“एका बाजूला भोंगे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंगे लावायचे तर लावा, पण भोंगे काढायला रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे”, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. प्रत्येक पक्षाची मुस्लिम विंग आहे. त्यामुळे भोंगे काढायला लावणे योग्य नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. “भोंगे अनेक वर्षांपासून आहेत. राज ठाकरेंनी भोंगे लावावेत. पण दोन धर्मात तणाव निर्माण करू नये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकदा भूमिका बदलली आहे. त्यांनी पक्षाच्या झेंड्याचा रंग देखील बदलला आहे”, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुढे म्हणाले की, “राज ठाकरे मोठे नेते आहेत. ते अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते. पण त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत. आपल्या देशात लोकशाही आहे पेशवाई नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं”, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.
“संविधानाच्या विरोधात कुणीही भूमिका घेऊ नये. प्रत्येकाला घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे. कुणाचं तोंड आपण बंद करू शकत नाही. पण बोलत असताना आपण काय बोलतोय याचं आपण भान ठेवलं पाहिजे. परंपरागत पद्धतीने मशिदीवर भोंगे आहेत. मशिदीवर आहेत भोंगे म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे”, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजलने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
‘ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांच्या गुरूपदी लादले’
भाजपने आयोजित केलेल्या पोलखोल सभेच्या स्टेजची आणि रथाची शिवसैनिकांकडून तोडफोड; फडणवीस आक्रमक