पंढरपुरमध्ये भाजपने केला राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; भाजपचे समाधान अवताडे विजयी

पंढरपुर |  राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुर मंगळवेढा विधानसभेत पोटनिवडणूक लागली होती. यामध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपने राष्ट्रवादीवर विजय मिळवला आहे.

भाजपचे समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यात  सामना पाहायला मिळाला. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा ३००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

मतमोजणीच्या सुरूवातीला राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर भाजपच्या समाधान अवताडे यांनी प्रत्येक फेरीत बाजी मारली आहे. अखेर राष्ट्रवादीची सत्ता खेचून घेण्यात भाजपला यश आले आहे.

आपल्या उमेदवराला विजयी करण्यासाठी भाजपचे आणि महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते पंढरपुर मंगळवेढ्यामध्ये ठाण मांडून बसले होते. संपुर्ण राज्याचे लक्ष या निवडणूकीच्या निकालाकडे लागले होते.

सकाळी ८ वाजल्यापासून निकालाला सुरूवात झाली होती. एक्झिट पोलनुसार भाजपचे समाधान अवताडेच विजयी होणार असं दिसत होती. आता एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला आहे.

दिवंगत आमदार भारत भालके यांनी एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा पंढरपुर मंगळवेढ्याची सीट जिंकली होती. मात्र भाजपने भालके यांच्या मुलाचा पराभव करत मोठा झटका दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.