काॅंग्रेस एनसीपीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपच्या प्रदीप गावडेला अटक

पुणे | सोशल मिडियावर राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी काही दिवसांपुर्वी पुणे सायबर पोलिसांकडे भाजच्या बड्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ५४ जणांविरेधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये अनेकजण राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस पक्षाशी संबंधित होते.

यानंतर आज मुंबई पोलिसांनी पुणे येथे येवून भाजप पदाधिकारी आणि वकील प्रदीप गावडे यांना अटक केली आहे. वांद्रे पश्चिम सायबर पोलिसांनी गावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.ही अटक राजकीय हेतूने  केली असल्याचं गावडे यांनी म्हटलं आहे.

गावडे यांनी सोशल मिडियावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यावर टीप्पणी केली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या  पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी आज सकाळी गावडे यांना पुणे येथून ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपासून गावडे ट्विटर अकाऊंटवरून धार्मिक द्वेश पसरवणारे ट्विट करत होते. असा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे. गावडे यांना अटक करण्याआधी पोलिसांनी कसलीही नोटीस दिलेली नव्हती. त्यांना बेकायदेशीर ताब्यात घेतले असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मुंबई पोलिस सत्ताधाऱ्यांच्या हातचं खेळणं झालं आहे. सरकारवर टीका करणं गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळा करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी मुंबई पोलिसांची असेल. असं भाजप आमदार राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! लसींमुळेच निर्माण होतायत कोरोनाचे नवे व्हेरिएंट, प्रसिद्ध साथरोग तज्ज्ञाचा दावा
महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या मृत गर्लफ्रेंडचे फोटो तुफान व्हायरल, पहा फोटो…
‘नवाजुद्दीन सिद्दीकी साधाभोळा नाही’, एअर होस्टेससोबत फ्लर्ट करतानाचा व्हिडीओ व्हायरल
पांरपारिक शेतीला फाटा देत केली श्रीलंकेच्या कोलंबस नारळाची शेती, कमावतोय १० लाख

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.