भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र व्हायरल; फलकावर सात, स्टेजवर पाच नेते अन् समोर एकच कार्यकर्ता…

मुंबई : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याचबरोबर सभा, बैठका, विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित केले जात आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

असे असतानाच भाजपच्या एका सभेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनीही हे छायाचित्र ट्विट केले आहे. हे छायाचित्र आहे भाजपच्या फ्लॉप सभेचे…! या छायाचित्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

सदर छायाचित्रामध्ये एका भल्या मोठ्या मैदानावर भाजपची सभा सुरू असल्याचे दिसते आहे. सभेच्या स्टेजवर पाच नेते दिसत आहेत. तर मागील फलकावर सहा-सात नेत्यांचे छायाचित्र आहे. स्टेजच्या समोरही काही मोजक्याच खुर्च्या आहेत. पण केवळ एकच व्यक्ती समोर बसल्याचे दिसत आहे. त्याच्यासमोरच एका वक्त्याचे भाषण सुरू असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, यावरून कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी हे छायाचित्र ट्विट करत भाजपाला लक्ष केले आहे. थरूर यांनी हे छायाचित्र ट्विट करताना ‘#PThepartyIsOver’ हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच ‘स्टेजवर पाच लोक, चित्रात सात नेते. प्रेक्षकांमध्ये एक व्यक्ती. आणि हे केरळमध्येही नाही,’ असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शालूचा अदांनी चाहते घायाळ; सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज…
कंगनाने काँग्रेस आमदाराला सुनावले; ‘मी कंबर हलवत नाही सरळ हाडं तोडते’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.