‘भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण सोबत पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह’

 

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात अनेक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. सोबतच काही राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे.

आता भाजपचे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबतच पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मी आणि माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. तसेच गेल्या २४ तासात ९ हजार १८१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहे.

तसेच गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर २४ गेल्या तासात ६ हजार ७११ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.