आसाममध्ये भाजपकडून काँग्रेस भूईसपाट; सलग दुसऱ्यांदा भाजपने केली सत्ता काबीज

आसाम विधानसभा निवडणूक निकाल २०२१ आज जाहीर होत आहे. आसाममध्ये तीन टप्पात मतदान पार पडले होते. विधानसभेच्या या निवडणूकीत भाजपने काँग्रेसला पराभुत करुन दुसऱ्यांदा आसाममध्ये सत्ता काबीज केल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळी ८ वाजेपासून मत मोजणी सुरु झाली होती. आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी मतदान झाले आहे. त्यामध्ये भाजप यामध्ये ६४ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला विधानसभेच्या निवडणूकीत ३९ मतदार संघात विजय मिळवता आहे.

आसाममध्ये सत्ता राखण्याच्या दृष्टीने भाजपने दमदार आघाडी घेतली आहे. मात्र मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार आहे. हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. सर्बानंदा सोनोवाल कि हिंमत बिस्वा या नेत्यांमध्ये कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपला १२६ जागांपैकी ८६ जागा मिळून बहूमत मिळाले होते. तर काँग्रेसला २६ आणि इतर पक्षांना १४ जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. त्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ ही राज्ये तर पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल आज जाहीर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन; रोज १००० टनाहून जास्त ऑक्सिजनची निर्मिती; राज्यांना मोफत वाटप
केरळमध्ये इतिहास घडला! काॅंग्रेसचा सलग दुसऱ्यांदा लाजिरवाना पराभव
‘या’ आहेत बॉलीवूडच्या सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्री; एक तर आहे फक्त पाचवी पास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.