मुंबई | भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून त्या महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
याबाबत उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी खास शैलीत या प्रश्नाचे उत्तर दिले. ‘मंत्रिमंडळ मीच निवडतो, तसेच कुणीही मला मंत्री करू शकत नाही, माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले आहे.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्यातून विजयी झाले होते. पण सप्टेंबर महिन्यात त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतरही उदयनराजे भोसले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच राज्यात बहुमत मिळून देखील भाजपला सत्तेपासून लांब राहावे लागले आहे. याचबरोबर भाजपामध्ये गेलेले अनेक बडे नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या देखील चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पाच बालकांना उचलून धगधगत्या आगीतून धावली होती शूर परिचारिका; काय घडलं होतं ‘त्या’ रात्री?
‘डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही’
भंडारा : …तर दुर्घटना घडली नसती; RTIच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर