नागपूर । राज्यातील पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीने या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली होती. सर्वात लक्षवेधी निवडणूक ही नागपूरची ठरली. काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांचा विजय निश्चित झाला आहे.
भाजपला नागपूरमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागत आहे. आता याची कारणे शोधली जात आहेत. यामध्ये भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाचे महत्वाचे कारण म्हणजे महानगरपालिकेतील तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे.
तुकाराम मुंढे यांना त्रास दिल्यामुळेच संदीप जोशी यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. नेटकऱ्यांनी तर सांगितले आहेच. पण भाजप नेत्यांनी देखील हे कबूल केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या सहाच महिन्यांच्या कालावधीमध्ये महापौर संदीप जोशी आणि तुकाराम मुंढे यांच्यात मोठा वाद झाला. अनेक प्रकरणात मुंढे यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हे प्रकरण केंद्रापर्यत गेले आणि लोकांची इच्छा नसताना देखील त्यांची बदली झाली. यामुळे नागपूरमधील लोकांत मोठी नाराजी पसरली होती. यातच भाजपने महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आणि लोकांनी या प्रकरणाचा राग या निवडणुकीत काढला.
या प्रकरणामुळे युवा तरुण नाराज झाला होता. तुकाराम मुढे यांच्या बदलीला देखील विरोध झाला होता. त्यांना निरोप देण्यासाठी नागपूरमध्ये मोठी गर्दी झाली होती. यामुळे महापौर यांना मोठा विरोध होताना दिसत होता.
यामुळे आज संदीप जोशींचा पराभव होता असताना नागपूरच्या युवकांनी तुकाराम मुंढे यांची आठवण काढली. आणि या कारणांमुळेच भाजप उमेदवार महापौर संदीप जोशी यांचा पराभव झाला. अशी चर्चा रंगू लागली आहे.