“माजी गृहमंत्री फरार’; हे देशातच नाही तर जगात पहील्यांदा घडतय”

महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कादायक घटना म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. आणि त्यानंतर अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती आणि राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी CBI कडे सुपूर्द करण्यात आली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात झालेला गैरव्यवहार आणि १०० कोटींच्या आरोपांविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना CBI कडून क्लीन चीट देण्यात आली होती.

पण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज असे दोन दिवस अनिल देशमुख यांच्या घरासह इतर मालमत्तांवर छापेमारी केली आहे.

अनिल देशमख हे सध्या गायब आहेत. ED त्यांचा शोध घेत असून त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी ईडी नंतर सीबीआय आणि आता आयकर विभाग यांचा भाजप गैरवापर करत असल्याचा आरोप महविकास आघाडीचे नेते करत आहेत. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशमुख आणि महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे.

“आयकर विभागाची जी छापेमारी आहे याकडे कोणत्याही राजकीय भावनेतून पाहू नये. या कारवाईमध्ये कुणाला त्रास देण्याचं काही कारण नाही. ते निर्दोष असतील, तर काळजी करण्याचं कारण नाही. आश्चर्य आहे की या राज्यात स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदा घडतंय की, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे माजी गृहमंत्री फरार आहेत. ज्यांच्याकडे या देशाच्या आर्थिक राजधानीची जबाबदारी होती, ते माजी पोलीस आयुक्तही फरार आहेत. हे देशातच नाही तर कदाचित जगात पहिल्यांदा घडत असेल,’ अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या
निलेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका, म्हणाले, ‘तु जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं’
मोठी बातमी! परमबीर सिंह बेपत्ता, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता
‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापुरती पण राहणार नाही’
वृषाली आणि अतुलचा अवघ्या २१ दिवसांचा संसार नदीने तिच्या पोटात सामावून घेतला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.