Share

पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगरसाठी राजीनामाही देईन; मुनगंटीवार आक्रमक

Sudhir-Mungantivaar.

औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर(Sambhajinagar) करण्यात यावं, ही मागणी गेल्या काही वर्षांपासुन शिवसेना आणि भाजप पक्षाकडून होत होती. पण महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर यावर कोणती ठोस भूमिका घेण्यात आली नव्हती. पण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने हा औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा उचलून धरला आहे.(bjp sudhir mungantivaar statement on aurangabad city name change )

सोमवारी विधानसभेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत घोषणा करावी, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली.

यावेळी विधानसभेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “दहा हजार कोटी वाघ एकीकडे आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखा छावा एकीकडे हे शौर्य तुम्हीही मानता. याबाबत कुणाचं दुमत नाही. मग नामांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाही ती पूर्ण करण्याची घोषणा का केली जात नाहीये”, असा प्रश्न भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, “या प्रक्रियेत केंद्र सरकारकडून काही मदत लागली तर मी स्वतः कार्यालयात उपस्थित राहीन. माझ्याकडून काही मदत झाली नाही तर मी स्वतः राजीनामा देखील देईन”, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनाला घेरले आहे.

सोमवारी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं, अशी मागणी केली. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. “१९८८ साली औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले होते, त्यावेळी बाळासाहेबांनी संभाजीनगर असं नामांतर करण्याची घोषणा केली होती”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“मी जर या बाबतीत मदत करू शकलो नाही तर राजीनामा देईन. आयुष्यात निवडणूक लढवणार नाही. पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात…”, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला(Shivsena) चांगलंच कोंडीत पकडलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
भयानक! ‘या’ शहरात कोरोनाचा हाहाकार, सापडले तब्बल २७ हजार रुग्ण, मोडले सर्व रेकॉर्ड
आम आदमी पार्टीचा मोठा निर्णय; ‘त्या’ शेतकऱ्यांना एकरी ४५ हजार रूपये नुकसानभरपाई देणार
मित्राला कोणच नव्हते, स्टीव्ह वॉने दिलेले वचन केले पुर्ण, काशीला येऊन मित्राच्या अस्थी केल्या विसर्जित

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now