मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मुंबईतील(Mumbai) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले होते. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजप पक्षातील नेत्यांवर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ईडीचा(ED) गैरवापर केला जातोय, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला.(bjp sudhir mungantivaar answer to shivsena sanjay raut allegation)
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात तब्बल साडे नऊ कोटींचे कारपेट वापरल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी हे विधान केले आहे.
यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार खुलासा करताना म्हणाले की, ” स्वतःच्या खर्चावर बोट ठेवलं जातं, तेव्हा मनुष्य अशाप्रकारे वागतो. मुलीच्या लग्नाची ही २ वर्षांपूर्वीची गोष्ट असून त्यांच्या विभागाने चौकशी करून अहवाल दिला आहे. त्या अहवालात काहीही सिद्ध झालं नाही”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
माझ्या मुलीच्या लग्न सोहळ्याला सध्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. “माझ्या मुलीच्या लग्नात असलेल्या मेहंदीवाल्याकडे ईडीवाले गेले, नेलपॉलिशवाल्याकडे गेले. मी कुठं कपडे शिवले हे विचारत माझ्या मुलुंडमधील टेलरकडेही ईडीवाले गेले होते”, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
“ईडीने माझे कपडे शिवणाऱ्या टेलरकडे ‘कितना पैसा दिया, क्या क्या दिया…’, अशी विचारणा केली. तुम्ही आमच्या घरात शिरताय, तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जाताय, दुकानात येताय”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केले. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाचे उदाहरण देखील दिले.
“भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईत मोठा सेट उभारण्यात आला होता. हे मंत्री मागच्या सरकारमध्ये वनमंत्री होते. या लग्न सोहळयात जंगलांचा देखावा करण्यात आला होता. त्यासाठी जे कारपेट अंथरण्यात आले, ते तब्बल साडे नऊ कोटी रुपयांचे होते”, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महत्वाच्या बातम्या :-
सहा एकरची देवराई जळून खाक झाल्यावर सयाजी शिंदेनी हात जोडून केली विनंती, म्हणाले..
NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा खळबळजनक दावा, म्हणाला..
”हिजाब अश्लील असेल तर आरएसएसच्या खाकी शॉर्ट्सवरही बंदी घालावी”