शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडून निकाल दिला आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह चोरांच्या हाती दिलं आहे. शिवसेनेविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा आणि पक्षपाती आहे. त्यामुळे हा आयोग बरखास्त केला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.
तसेच ते पुढे म्हणाले होते की, निवडणूक आयोगाच्या प्रत्यक्ष निवडणूका घेतल्या पाहिजे. त्यानंतर आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या या मागणीला भाजपच्या बड्या नेत्याने समर्थन दिले आहे.
शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे खुपच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाला बरखास्त करण्याची मागणी केली आहे. सध्याचे निवडणूक आयोग हे पक्षपाती निर्णय घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आम्ही निवडणूक आयोगाला एवढे शपथपत्र पुरवले, प्रतिज्ञापत्र पुरवले पण त्यानंतर आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर जर निर्णय देत असतील तर ते योग्य नाही. आम्हाला एवढा खर्च कशाला करायला लावला. त्यामुळे निवडणूक घेऊन नवा निवडणूक आयोग नेमला पाहिजे, असे ठाकरेंनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या या मागणीला भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण आयोगाचे कामकाज संशयास्पद आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांच्या मागणीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ते भाजपमधील जेष्ठ नेते आहे. ५ वेळा सुब्रमण्यम स्वामी हे लोकसभेत खासदार राहिलेले आहे. १९९० मध्ये केंद्र सरकारमध्ये ते कायदा आणि व्यापारमंंत्री सुद्धा होते. त्यामुळे इतक्या मोठ्या भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दिल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
त्यांना माझ्या कपाळावरील भगव्याची अडचण नाही, मग मला त्यांच्या बुरखा अन् टोपीची अडचण का असावी?
प्रवासी हेरतात अन् गुगल पे करायला सांगतात; एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांची लज्जास्पद लाचखोरी
पुण्यात भीषण अपघातात अख्ख कुटूंब जागीच संपलं, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्यांवर काळाचा घाला