आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून महाराष्ट्र्रातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आलं आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर भाजप पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.(bjp politician chitra wagh tweet pusha film dialogue on mahavikas aghadi sarkar)
या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. या निकालानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजप पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी ‘पुष्पा'(Pushpa) चित्रपटातील एक संवाद ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
“महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे. कायदा-नियम पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलं आहे. महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे आता स्पष्ट झालं आहे. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है..!”, असे उपरोधिक ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1486943174992236545?s=20&t=ToAl1owQjdiBipVefAS44g
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने आणि अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत भाजपच्या बारा आमदारांचं ५ जुलै २०२१ रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. निलंबित १२ आमदारांमध्ये अतुल भातखळकर, माजी मंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश होता.
काही दिवसांपूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनात या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी भाजपने केली होती. पण महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या या मागणीला नकार देत त्या आमदारांचं एक वर्षाचं निलंबन कायम ठेवलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. “सरकारनं हे षडयंत्र रचलं होतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय योग्य आहे. आमच्यावर मोठा अन्याय केला होता. हा निर्णय ऐतिहासिक आहे. सरकारच्या हुकुमशाहीच्या निर्णयाला चपराक बसली आहे”, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या निकालावर दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पॉर्न स्टारने उघड केले एडल्ट फिल्म इंडस्ट्रीचे रहस्य, म्हणााली, शुटींगदरम्यान येतात ‘या’ समस्या
RRB Group D च्या विद्यार्थ्यांसोबत सरकारने रातोरात काय फसवणूक केली? जाणून घ्या का पेटलाय वाद..
दीपिका पादुकोनने उघड केले रणवीर सिंगचे बेडरूममधील रहस्य; म्हणाली, बेडवरच जास्त वेळ..






