..वेळ आली तर सेनाभवन फोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

भाजपच्या दादरच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी प्रसाद लाड असे म्हणाले की, वेळ आली तर सेनाभवन फोडू. यावेळी प्रसाद लाड यांच्यासमवेत नितेश राणे यांनीही सेनेवर निशाणा साधला.

प्रसाद लाड यावेळी म्हणाले की, दक्षिण मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कोणी थांबणार नाही. सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत. असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला.

शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. ते पुढे असेही म्हणाले की माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान ५ नगरसेवक निवडूण आणणार आहोत.

किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू. शिवसेनेला ताकद देण्याचे काम आम्ही केले आता त्यांची ताकद तोडायचं काम आम्ही करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पुढच्या वेळी आम्ही इतके कार्यकर्ते घेऊन येणार नाही.

आमच्या कार्यक्रमाला पोलिस इतके असतात. मात्र आम्हाला त्याची गरज नाही. पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये यावं असंही प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, याला शिवसेना आमदार सदार सरवणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेची शाखा म्हणजे आम्ही मंदिर मानतो.

त्यातून लोकांची सेवा करतो. भाजपाने सुद्दा शाखेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी. त्यांनी कार्यालय युद्ध खेळण्यासाठी नाही हे समजावं. भाजपचे नेते याआधीही सेना भवनावर भुंकले होते. शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचं कोणीही वाकडं करू शकत नाही.

सेनेवर आरोप करणारी व्यक्ती वैचारिक दिवाळखोरी असलेली आहे. दादरमधील लोकांना समाजसेवाची गरज आहे युद्धाची नाही. छत्रपतींच्या नावाचा वापर भाजपकडूनही केला गेला आहे. महापालिकेची स्वप्ने यांनी बघू नयेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या
आमदार आणि एसटीमधून प्रवास करतोय? कंडक्टरचा विश्वास बसेना, यानंतर गणपतराव देशमुख यांनी…
येथे लग्नानंतर तीन दिवस वधू आणि वर शौचालयास जाऊ शकत नाही, काय आहे कारण, जाणून घ्या…
दिपीका लवकरच देऊ शकते गुड न्युज? रणवीर-दिपीकाला हॉस्पिटलबाहेर स्पॉट करताच चर्चांना उधान 
श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट इमोजीवाली ‘ही’ व्यक्ती कोण?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.