पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपचा थेट विरोध; ‘संचारबंदी नको तर…’

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

मात्र पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपने तीव्र विरोध दर्शविला आहे. ‘हॉटेल्स पूर्ण क्षमतेनं बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या अशी मागणी भाजपनं केली आहे. संचारबंदी नको तर जमावबंदी असावी अशी भूमिका भाजपने मांडली आहे.’

याबाबत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, ‘पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा, अशी मागणी बापट यांनी यावेळी बोलताना केली.

वाचा संपूर्ण नियमावली…
अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे.

सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे.

शाळा, महाविद्यालयं ३० एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. तर, यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांटी गैरसोय होऊ देणार नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! पुण्यात मिनी लॉकडाउन; बार, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह पीएमपीएल बससेवा सात दिवसांसाठी बंद राहणार

आनंद महिंद्रांनी नटराजनला दिलेला शब्द पाळला; केली शानदार महींद्रा थार गिफ्ट

सचिन तेंडूलकरची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रूग्णालयात दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.