याला म्हणत्यात निष्ठा! शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर

मुंबई | ‘पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या प्रमुख चेहरा भाजपमध्ये हवा, तुमच्या निवडणुकीसाठी १०० कोटी लागले, तरी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ती ऑफर होती,’ असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

ल्हासुर्णे येथील निवासस्थानी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाचा लेखाजोखा सांगण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती.’

तसेच ‘तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ती ऑफर होती; परंतु राष्ट्रवादीवरील आणि पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यावरील निष्ठा अढळ असल्याने मी भाजपची ऑफर धुडकावली होती,’ असा खुलासा देखील शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपने यश मिळवले असले, तरी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम आहे.

यामध्ये कोरेगाव मतदारसंघातील ७७ पैकी ५४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे वर्चस्व असून, सरपंचपदाच्या निवडीनंतर आणखी काही ग्रामपंचायती आमच्या ताब्यात येतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या
जुन्या १०० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? आरबीआयने दिली महत्वाची माहिती
आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु; पुन्हा एकदा नोटबंदी?
धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.