Share

आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या मुंबईची आदित्यसेनेने गटारगंगा केली, नितेश राणेंची बोचरी टीका

nitesh rane & aaditya thakre

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता भाजपने मुंबई महानगर पालिका शिवसेनेच्या हातातून हिसकवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. मुंबईत निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवरून भाजपकडून(BJP) सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(bjp nitesh rane tweet about aaditya thakre)

त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. यादरम्यान पावसाळ्यात मुंबईमधील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. तसेच नालेसफाईवरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आदित्यसेनेने मुंबईची गटारगंगा केली आहे, अशा शब्दांत भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये भाजप नेते नितेश राणे म्हणाले की, “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईची मात्र आदित्यसेनेनं ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे”, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1545958543634796544?s=20&t=WjNSb5l24dnOlulXqYe8Og

महाविकास आघाडीचं सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांच्या संदर्भात अनेक आश्वासने दिली होती. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.

मुंबईतील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या पहिल्याच पावसात पाणी तुंबले होते. यावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पहिल्याच पावसात मुंबई महानगर पालिकेची पोलखोल झाली आहे. ठेकेदारांनी भ्रष्टाचार करत मुंबईचे पाच हजार कोटी बुडवले आहेत, असे देखील नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

कंत्राटदारांनी खूप पैसे मिळवले आहेत. ते खूप मजेत आहेत. पण मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवसेनेने मुंबईची तुंबई करून दाखवली, असा आरोप नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. यापूर्वी देखील भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘शिवसेनेचा पाठिंबा हवा असल्यास भाजपने मातोश्रीवर यायला हवे’, उद्धव ठाकरेंची अपेक्षा
मोठी बातमी! शिवसेना भाजपला देणार पाठिंबा? उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर ठेवली ‘ही’ अट
पत्रास कारण की…! राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र; ‘या’ कारणामुळे उद्याचा मेळावा रद्द, वाचा सविस्तर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now