गेल्या काही दिवसांपासून राणे विरुद्ध शिवसेना असा वाद सुरु आहे. या वादात नेहमीच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जातात. आता पुन्हा एकदा राणे कुटूंबियांतील एका सदस्याने शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.(bjp nilesh rane tweet on cm uddhav thakre)
निवडणूक जवळ आली की मुख्यमंत्र्यांना स्व. आनंद दिघे साहेबांची आठवण येते, असा खोचक टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये भाजप नेते निलेश राणे यांनी नगरविकास मंत्री आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
तसेच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, “शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही.”
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1525061245535068160?s=20&t=h3BDKg5AnPDudiIRWQGzMQ
स्व. आनंद दिघे साहेबांच्या कुटूंबियांना शिवसेनेकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटमधून केला आहे. नुकताच शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने शिवसेना नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाचे बॅनर सर्वत्र लागलेले दिसत आहेत. शिवसैनिकांसोबतच अनेक चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे या सोहळ्याला हजर होते. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“पवार साहेब पाकिस्तानात तुमचं स्वागत केलं कारण त्यांना त्यांची माणसं बरोबर कळतात”
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शामीने सुनावले, ‘थोडं थांबा, नुसता वेग कामाचा नाही..
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शमी म्हणाला, त्याच्याकडे वेग आहे पण…