भाजप खासदाराने ३० रुग्णवाहिका लपवून ठेवल्या होत्या घरात; असा झाला पर्दाफाश

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला दिसून येत असून त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. बिहारची परिस्थितीही खुप गंभीर असून तिथेही रुग्णांच्या उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे.

अशात बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमधल्या सरण लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री राजीवप्रताप रुडी यांच्या घरात त्यांनी तब्बल ३० रुग्णवाहिका लपवून ठेवल्याची घटना घडली आहे. माजी खासदार पप्पु यादव यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.

राजीवप्रताप रुडी यांनी आपल्या घरात ३० रुग्णवाहिका ताडपत्री टाकून लपवून ठेवल्या होत्या. त्यानंतर या गोष्टीची माहिती पप्पु यादव यांना मिळताच त्यांनी या सर्व गोष्टींचा भांडाफोड केला आहे. एकीकडे बिहारमध्ये रुग्णांचे हाल होत आहे, अशा परिस्थितीत भाजप खासदाराने ३० रुग्णवाहिका पळवून लावल्याचे पप्पु यादव यांनी म्हटले आहे.

तसेच या ठिकाणी आणखी १०० रुग्णवाहिका होत्या मात्र त्या हलवण्यात आल्या. हा खुप मोठा गफला असल्याचा आरोपही पप्पु यादव यांनी राजीवप्रताप रुडी यांच्यावर केला आहे.

तसेच या सर्व प्रकरणावर राजीवप्रताप रुडी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या ठिकाणी केवळ २० रुग्णवाहिका मात्र त्या चालवण्यासाठी चालकच उपलब्ध नसल्याने आम्ही त्या जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्त करु शकलो नाही, असा दावा राजीवप्रताप रुडी यांनी केला आहे. तसेच रुग्णवाहिका चालवू शकणाऱ्या डॉक्टरांनाही आम्ही याबाबत विचारपुस केली होती. पण त्यासाठी कोणी तयार झाले नाही, असेही रुडी म्हणाले आहे.

मधौरा गावात या सर्व रुग्णवाहिका झाकुन ठेवण्यात आल्या होत्या. यादव आपल्या समर्थकांसह तेथे पोहचले आणि पत्रकारांसमोर रुग्णवाहिकांवरील ताडपत्री काढून या सर्व घटनेचा खुलासा केला आहे. खासदार निधीतून या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या असे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड, शेतातूनच काढली वरात; पहा भन्नाट व्हिडिओ
‘बाबूजी जरा धीरे चलो’ म्हणत रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री, या कारणामुळे झाली बॉलीवूड मधून गायब
प्रेरणादायी! स्त्री असल्यामुळे कोणीही नोकरी देईना, संधीचे सोने करत उभी केली ५० हजार कोटींची कंपनी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.