ब्रेकिंग! भाजप खासदार नारायण राणे दिल्लीत, केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली । भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. ते आता दिल्लीत देखील दाखल झाले आहेत. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. राणे हे माजी मुख्यमंत्री देखील आहेत. प्रशासनामध्ये त्यांना मोठा अनुभव आहे.

राणे हे दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. नारायण राणे हे एका महिन्यापूर्वी दिल्लीला जाऊन आले होते. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी त्यांना ठाम खात्री असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते स्वत:हून दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल असा ठाम विश्वास राणेंना असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना ताकद देण्यासाठी त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून शिवसेनेवर ते जोरदार टीका करत आहेत. यामुळे याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. राणे हे आक्रमक आहेत. राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकणात आले होते.

त्यावेळी अमित शाह यांनी नारायण राणेंच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले होते. तसेच त्यांनी कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळवून दिलेल्या यशाचे बक्षीस त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून दिले जाण्याची चर्चा रंगली आहे.

यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांना स्थान मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याकडे शिवसेनेचे देखील लक्ष लागले आहे. यावर बरेच राजकीय गणित अवलंबून आहे.

ताज्या बातम्या

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यावर आता आलीय उपासमारीची वेळ, घर खर्चासाठीही नाहीत पैसे

…तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवले यांच्या वक्तव्याने खळबळ

अभिनेता विजय संचारी यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला हा अभिमानास्पद निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.