Share

‘राज ठाकरे दंबग नाहीत, ते तर उंदीर’; भाजप खासदाराच्या घणाघाती टिकेने राजकारण तापले

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. यावरून उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना सूचक इशारा देखील दिला होता. राज ठाकरे(Raj Thakare) यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं.(bjp mp brijbhushan singh criticize raj thakare)

तसेच भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता. यानंतर पुन्हा एकदा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “राज ठाकरे दबंग नाहीतर उंदीर आहेत. ते पहिल्यांदा बाहेर पडत आहेत”, अशा शब्दात भाजप खासदार शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय लोकांना विरोध केला. त्यांना मारहाण केली. पण आता आम्ही शांत बसणार नाही. आम्ही महाराष्ट्रात जाऊन राज ठाकरेंना उत्तर देऊ”, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले.

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले की, “राज ठाकरे पूर्वी उत्तर भारतीयांना मारहाण करत होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष त्यांना सुरक्षा द्यायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. सरकार बदललं आहे. आता राज ठाकरेंना सुरक्षा मिळणार नाही. जर कोणताही व्यक्ती देश तोडण्याची भाषा करत असेल, तर त्या व्यक्तीची सुरक्षा सरकारने हटवली पाहिजे”, असे आवाहन भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं आहे.

“आम्ही मराठ्यांना विरोध करत नाही. जर मराठे अयोध्येमध्ये आले तर आम्ही त्यांचे नक्की जंगी स्वागत करू. आमचा विरोध फक्त राज ठाकरेंना आहे”, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे विधान भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी मनसे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मनसे पक्षाचे कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत अयोध्येत दाखल होणार आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी मनसे पक्षाकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात येत आहे. या दौऱ्यात राज ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘तुमचे आमदार निर्दोष, अनिलबाबू लवकर बाहेर येतील,’ रोहितदादांनी दिला शब्द
‘हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?’, शिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करत भाजपचा संतप्त सवाल
सत्ता डोक्यात जाते, तेव्हा जनताच एक दिवस ती नशा मतपेटीतून उतरवते; चित्रा वाघ किशोरी पेडणेकरांवर भडकल्या

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now